करमाळासोलापूर जिल्हा

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी करमाळा येथे निषेध

प्रतिनिधी सुनिल भोसले

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची साकोरे ता.शिरूर अंतपाल जि लातुर येथे विटंबना झालेल्या घटनेचा मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने करमाळा तहसिल कार्यालय येथे जाहीर निषेध व्यक्त करून तहसीलदार समीरजी माने करमाळा पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष शरद पवार बोलताना म्हणाले , साहित्यरत्न आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि ज्या विकृताने हे  क्रुत्य केलेले आहे अश्या विकृत व्यक्तीला  प्रशासाने अटक  करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मातंग एकता आंदोलन संघटनेच्या वतीने करण्यात आली.

यावेळी तालुका अध्यक्ष शरद पवार, रतन शिंदे (जि, उपाध्यक्ष), श्री.दत्ता चव्हान ( ता.युवक अध्यक्ष), नितीन शिंदे संघटक, युवा शहर उपाध्यक्ष अनिकेत शिंदे, नितीन आलाट, श्याम शेंडगे, पप्पू मंडलिक, दीपक शिंदे उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE