ताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

राजकारण बाजुला ठेवत आ. संजयमामांनी पुर्ण केली जेऊरकरांची इच्छा

करमाळा समाचार – जेऊर

कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक अडचणींवर मात करत आ. संजयमामा शिंदे यांनी राजकीय चर्चेत आसलेले जेऊर चे डेडिकेटेड कोविड केअर सेंटर चालू करून दाखविले. करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आमदार शिंदे यांनी ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर केल्यानंतर माजी पं.स. सदस्य विलास दादा पाटील व जेऊर चे व्यापारी अभयराज लुंकड यांनी आमदार शिंदे यांच्याकडे जेऊर येथील ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांट मंजूर करण्याची मागणी केली होती.

त्या मागणीस प्रतिसाद देत आ. शिंदे यांनी शासन दरबारी जेऊर येथे ऑक्सिजन जनरेशन प्लांट ची मंजुरी घेतली आहे. सदर ऑक्सिजन प्लांट या ठिकाणी झाल्यानंतर परिसरातील २५ ते ३० गावांना त्याचा कायमस्वरूपी फायदा होणार आहे .

सदर ऑक्सिजन प्लांट मंजुर झाल्याची माहिती आ. शिंदे यांनी दिल्यानंतर तो प्लांट उभा करण्याचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी करण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमोल डुकरे , वैद्यकीय अधिकारी डॉ .राहुल कोळेकर त्यांची शासकीय टीम व माजी पं. स. सदस्य विलास दादा पाटील , व्यापारी अभयराज लुंकड ,उमेश पाथ्रूडकर, पै. चंद्रहास निमगिरे , बालाजी गावडे, सत्यम सूर्यवंशी, निकील मोरे, महेश कांडेकर ,समीर केसकर, अमित संचेती, राहुल लोंढे आदी उपस्थित होते.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE