अल्पवयीन मुलामुलींनी सोडली लाज ; गल्ली बोळात सुरु आहेत नको असलेले चाळे
करमाळा समाचार (karmalasamachar)
“बडे मिया छोटे मिया” या सिनेमातील एक गाणं तुम्ही ऐकलं असाल. त्यामध्ये गोविंदा आणि रविना टंडन गाणे म्हणत असताना “किसी डिस्को मे जाये, किसी होटल मे खाये, कोई देख नही लेना हमे चलो घूम के आये हम” असे म्हणत हिंदी सिनेमातील हे गाणं प्रेमीयुगलांमधील लाज जिवंत ठेवत दाखवण्याचा प्रयत्न सिने दिग्दर्शिकाने केला होता. पण आता ही लाज सगळ्यांनी सोडली का ? असा प्रश्न पडत आहे.
पूर्वीपासूनच भारतीय संस्कृती प्रमाणे आपल्या भारत देशात ज्येष्ठांचा मान सन्मान घरातील मोठ्या मंडळींपासून ते छोट्या मंडळींपर्यंत सर्वच करीत असल्याचा आपण पाहिलेला आहे. पती-पत्नी आपल्या घरात वावरतानाही घरातील लहान तसेच मोठ्यांसमोर पुढच्या व्यक्तीला लाज वाटेल अशी चाळे करत नसत. पण सध्याच्या पिढीने ही सगळीच लाज वेशीवरच टाकलेली दिसते. जे चाळे आपण घरात करत नव्हतो ते आता चौका चौकातून बघायला मिळू लागले आहेत.
सैराट ((sairat) सारखा सिनेमा करमाळा तालुक्यात बनला तेव्हापासून तर प्रत्येकालाच आपण आर्ची आणि परश्या झाल्यासारखे वाटू लागला आहे. ना कोणाची किंमत, ना कोणाची लाज, ना कोणाची भीती अशी परिस्थिती सध्या युवकांमध्ये तर सोडाच हो लहान लहान मुलांमध्येही क्रेज बघायला मिळत आहे. सध्या आपली संस्कृती आपला देश आपले राज्य, गाव कोणत्या दिशेने जाते हे पाहणे गरजेचे आहे.
गावातील बऱ्याच ठिकाणी दोन गल्ल्यांना जोडण्यासाठी बोळींचा माध्यम आहेत. या बोळींमध्ये सहसा जास्त रहदारी नसल्यामुळे त्या ठिकाणी जाणारा येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर नसते. त्यामुळे अशा अडोशाचा फायदा उचलत हे प्रेमी युगल या ठिकाणी गप्पाटप्पा तर मारतातच वेळप्रसंगी हे अंगाशी झोंबा झोंबी ही करताना दिसतात. त्यामुळे परिसरातील दुकानदार तसेच महिला व नागरिकांना त्या परिसरातून लाजत स्वतःच तोंड दुसरीकडे करून जावे लागते. परंतु अशा या टवाळखोर मुला-मुलींना कसलीच लाज शिल्लक राहिली नाही.
मुलींची छेड काढली जात असेल, मुलींचा पाठलाग केला जात असेल तर पोलीस यंत्रणा त्यासाठी काहीतरी काम करू शकेल. पण जर मुली स्वतःहून अशा बोळींमध्ये स्वतःचं लाज आणि आई बापाची इज्जत वेशीवर टांगून जर मुलांची बोलत असतील चुकीचे चाळे करत असतील तर कोणतीच यंत्रणा यावर लगाम लागू शकत नाही. पण अशा लोकांना वेळीच वाटणीवर आणले नाही तर उद्या हीच लोक स्वतःच्या घरात व चौकात असले चाळे करण्यासाठी घाबरणार नाहीत. त्यामुळे पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
आजकाल मुलींच्या हातात महागडे मोबाईल आले आहेत. त्यामुळे संपर्क करणे सोपे झाले आहे. आई वडील मुलांना शाळेत पाठवतात व विसरून जातात. मुलं मुली वर जो विश्वास असतो त्या विश्वासाला ते पात्रच राहतील असे नाही. आज त्यांचं वय कमी आहे ते बऱ्याच भुल थापांना बळी पडतात. अशा भूलथापांना बळी पडू नये म्हणून वेळोवेळी पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाला वाटते आपलं मूल असं चुकीचं पाऊल उचलणार नाही. पण आजकाल कोणाचाच भरोसा राहिलेला नाही. ज्यात्या वयात त्यात्या गोष्टी शोभतात. त्यामुळे आत्ताच कमी वयात मुले बिघडली तर नाहीत ना याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.