वीट परिसरात छोटा हाथी गाडीचा अपघात ; दहा जण जखमी
करमाळा समाचार
दौंड येथून झरे येथे देवाच्या कार्यक्रमाला येत असताना वीट परिसरात छोटा हाथी (हत्ती) गाडी रस्त्यावरून खाली गेल्यामुळे झालेल्या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत, यावेळी वीट परिसरातील युवकांनी सदरच्या छोटा हाती गाडीतील जखमींना वेळीच बाहेर काढले व करमाळा येथील रुग्णालयात पाठवले. यातील दोन जण गंभीर तर आठ जण जखमी आहेत. सदरचा अपघात सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

पृथ्वी विठ्ठल जाधव 10
लता हरिनाथ वेताळ, 40
सुप्रिया सागर लष्करे वय 27
ज्ञानेश्वर शंकर शिंदे वय 50
नीता विठ्ठल जाधव वय 35
चांगुनाबाई यशवंत पवार वय 60
आशा राजेंद्र शिंदे वय 32
छाया ज्ञानेश्वर शिंदे वय 53
सारिका संतोष शिंदे वय 35
वसंत एकनाथ जाधव वय 80 रा. पोस्ट ऑफिस मागे वडार गल्ली दौंड यातील दोन बाहेर पाठवले तर इतरांवर करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
