नामसाधना शाळेत श्रीकृष्णजन्माष्टमी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा
करमाळा –
मंगळवार दि २७ ऑगस्ट रोजी वरील शाळेत दहीहंडी उत्सव प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे व केंद्र समन्वयक दयानंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आला. यावेळी नामसाधना प्राथमिक विद्यामंदीर शाळेत दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला.

शाळेच्या नयनरम्य व प्रसन्न वातावरणात पहिलेचे बालगोपाळ श्रीकृष्णाच्या रुपात खूपच सुंदर दिसत होते. पहिलीच्या पालकांनी आपापल्या पाल्यास श्रीकृष्णाच्या रूपात सजवून आणले होते. पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी आनंदाने भेभान होऊन कृष्णाच्या गाण्यावर नृत्याचा आनंद लुटला. शालेय आवारात दहीदंडी सजवून उंचावर बांधली होती. महिला शिक्षकांनीही टिपरी नृत्यावर ठेका धरला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्या़ध्यापिका सुनंदा जाधव, उपशिक्षक श्री. कोळी, सुनिता उबाळे, सुनिता भैलुमे, धनश्री उपळेकर, आशा अभंगराव, वैशाली जगताप, मंगल गलांडे, सुषमा उबाळे, सुरेखा अवचर, लालासाहेब शेरे, आश्विनी ठाकरे, गौरव पलिकोंडवार यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालक उपस्थित होते.