डॉ. वैभव निर्मळ यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार
करमाळा
संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तर्फे आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेबद्दल या वर्षीचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार डॉ. वैभव हनुमंत निर्मळ ( विश्वनिर्मळ आयुर्वेद हॉस्पिटल) यांना प्रदान करण्यात आला.

या प्रसंगी नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार मा.श्री. सुधीर तांबे , माजी खासदार श्री.भाऊसाहेब वाकचौरे यांचे चिरंजीव रोहित वाकचौरे, कोपरगावच्या मा. आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव युवा नेते विवेक भैय्या कोल्हे पाटील , शिक्षण महर्षी श्री.लक्षणरावजी पठाडे ,आयोजक श्री. डॉ. ज्ञानेश्वर सानप, रोशन सानप, श्री. गणेश सांगळे, डॉ.ऋषिकेश निर्मळ सर, श्री.विकास माने साहेब आदी सह मान्यवर नागरीक यांच्या प्रमुख उपस्थितीत मानपत्र, गौरवचिन्ह, सन्मानचिन्ह, महावस्त्र, गौरव पदक देऊन हा सन्मान सोहळा संगमनेर येथील मालपाणी हेल्थ क्लब येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
