बिबट्याच्या तोंडातुन वासराला वाचवण्यात यश ; वडगाव येथे वासरावर बिबट्याचा हल्ला
करमाळा समाचार
मांगी, पोथरे, वडगाव परिसरात अद्यापही बिबट्या हल्ले करत आहे. तरीही वनविभाग अजूनही बिबट्याला पकडण्यासाठी केवळ दिखाऊ कार्यवाही करताना दिसून येत आहे. मुळातच वन विभागाला बिबट्याला पकडण्यात रस आहे का नाही हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. चार ऑगस्ट पासुन बिबट्या मजेत तालुक्यात वावरत आहे. वनविभाग काय करतय ?

मांगीत एका शेतात एक गाई व वासरू बांधले होते. मात्र गाई दोरी तोडून पळून गेली तर लहान वासरू मात्र बिबट्याने हल्ला करून फस्त केले होते.

त्यानंतर वडगाव उत्तर येथे बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून फस्त केले होते. हा प्रकार (गुरुवारी) दुपारी १२ वाजताच्या सुमारास समोर आला होता. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा या भागात वावर आहे. त्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावला आहे. पण बिबट्या पिंजरा सोडुन दुसरीकडे फिरत आहे.
तर आज पहाटे उत्तर वडगावात लोकांच्या कालव्यामुळे एका वासराचा जीव वाचला आहे. बिबट्याने हल्ला केल्या नंतर लोकांनी आरडाओरडा केला त्यामुळे बिबट्या पळुन गेला आहे. सदरच्या बिबट्या करमाळा शहराच्या हद्दीवर असुन त्याने लोकांवर हल्ले करायची वाट वनविभाग बघतय का ?