करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीसाठी चुरशीने मतदान पहिला टप्पा दस हजारी

करमाळा समाचार 


51 पैकी 49 ग्रामपंचायतीसाठी होत असलेल्या निवडणुका साठी सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. अतिशय उत्साही वातावरणात व शांततेत मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर साडे नऊ वाजेपर्यंत दहा हजार 462 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे. त्यामध्ये तीन हजार 972 स्त्रिया 6490 पुरुषांचा समावेश आहे.

तालुक्यात होत असलेल्या ५१ ग्रामपंचायती पैकी सालसे व जेऊरवाडीसह आकरा प्रभागासह ४६ सदस्य बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतीसाठी १५९ मतदान केंद्रावरुन आज सकाळी साडे सात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत मतदान होणार आहे. यासाठी ७९ हजार ९६२ एकूण मतदार मतदान करणार आहेत.

निवडणुकांमध्ये ५१ पैकी दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ४९ ग्रामपंचायतीचे मतदान शुक्रवारी होत आहे. त्यामध्ये त्यामध्ये ३३ हजार २८३ स्त्री मतदार तर ४६ हजार ६७८ पुरुष असे एकुन ७९ हजार ९६२ मतदार तर देवळाली येथे एक तृतीयपंथी मतदार सहभागी होणार आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी १५९ पथके नेमली असून त्यात प्रत्येक पथकात सहा कर्मचारी काम पाहणार आहेत तालुक्यात १५३ प्रभाग व १५९ मतदान केंद्र आहेत ४३५ सदस्य ४६ बिनविरोध झाल्याने ३८९ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासाठी ८६१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याने त्यामध्ये चुरस निर्माण झाले आहे.

हे झाले बिनविरोध
जेऊरवाडी – लता निमगिरे, तात्यासाहेब निमगिरे, माया निमगिरे, कल्पना निमगिरे, योगेश निमगिरे, गोरख निमगिरे, जयश्री शिरस्कर, सालसे – अशोक पवार, हरिदास सालगुडे, संगीता हांडे, सुदामती घाडगे, प्रताप हांडे, सुनिता लोकरे, कौशल्या येवले, गजराबाई काळे, सतीश ओहोळ, नेरले – कांचन काळे, रुक्मिणी काळे, आळसुंदे- केशव देवकते, अपर्णा घाडगे, विजय गावडे, सखुबाई अवघडे, अमृता कोकरे, मंगेश बोंद्रे, प्रकाश डोंगरे, कौशल्या कामटे, पोटेगाव – गजराबाई गोसावी, वर्षा हाळनोर, आशा जगदाळे, बारिकराव जगदाळे, वैशाली हराळ, पाथर्डी- अश्विनी मोटे, रोशेवाडी- ज्ञानदेव पवार, सारिका चव्हाण, मांगी- अभिजीत काळे, दिलमेश्वर- अविनाश राक्षे, पांडे- भिवा वाघमोडे, गुळसडी- सिंधुताई खंडागळे, सरपडोह – मालन वाळके, जनाबाई मारकड, भानुदास शिंदे, सुप्रिया भिताडे, अर्चना गवारे, बिटरगाव श्री – वंदना मुरूमकर, सारिका वाघमोडे आदि निवडणुकीत बिनविरोध निवडणुक जिंकले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE