खो – खो स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालयाचे यश
करमाळा समाचार
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करमाळा तालुकास्तरीय खो – खो स्पर्धा विट ता. करमाळा येथे पार पडली. या स्पर्धेत महात्मा गांधी विद्यालय येथील खेळाडूंचे घवघवीत यश प्राप्त केले. वर्षे 17 वर्षे वयोगटात मुले महात्मा गांधीं विद्यालय करमाळा येथील खेळाडूने तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. 14 वर्षे वयोगटात मुले द्वितीय क्रमांक. 17 वर्षे वयोगट मुली तृतीय क्रमांक . 19 वर्षे वयोगट मुले तृतीय क्रमांक , खो-खो स्पर्धेत महात्मा गांधीं विद्यालय करमाळा येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले.

संस्थेचे चेअरमन मा आ. जयवंतराव जगताप साहेब मा. नगराध्यक्ष श्री वैभवराजे जगताप संस्थेचे विश्वस्त श्री शंभूराजे जगताप यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री बागवान सर जेष्ठ पर्यवेक्षक श्री पाटिल सर पर्यवेक्षिका सौ. नवले मॅडम ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख श्री पवार सर यांनी खेळाडूंचे गुलाब पुष्प गुच्छ देउन अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक श्री दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंना पुढिल यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुत्र संचालन श्री तिवाटणे मॅडम यांनी केले.
