बंधन बॅंक घोटाळा प्रकरणातील संशयीत व्यवस्थापक वर्षानंतर बंधनात ; नेमके काय आहे संपुर्ण प्रकरण ?
करमाळा समाचार
शहरातील बंधन बॅंकेच्या शाखेत साथीदाराच्या सहाय्याने दोन कोटी दहा लाखांचा अपहार करुन पलायन केलेल्या व्यवस्थापकाला पकडण्यात सोलापुर आर्थीक शाखेला यश आले आहे. तब्बल वर्षानंतर संबधीत व्यवस्थापक गळाला लागला आहे. शनिवारी न्यायालयात हजर केले यावेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रशांत घोडके यांनी पाच दिवसांची ( दि १०) पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणातील इतर पाच आरोपी फरार आहेत. व्यवस्थापक राहुल मुंडे यांच्या वतीने ॲड. अलिम शेख यांनी काम पाहिले.

राहुल साहेबराव मुंडे रा. शाहुनगर, करमाळा असे व्यवस्थापकाचे नाव आहे. पोलिसांच्या वतीने चौदा दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. पण न्यायालयाने पाच दिवसाची मंजुर केली आहे. यापुर्वी एक हाती लागला होता तर इतर पाच आरोपींचा शोध कामी ही कोठडी कामी येईल तसेच रक्कमही शोधण्याचा प्रयत्न पोलिसांचा राहिल.

याबाबत अधिक माहीती अशी की, येथील बंधन बॅकेच्या करमाळा शाखेचे दैनेदिन कामकाज सुरू असताना बॅकेचे अधिकारी ऑडीटसाठी सरप्राईज विझीट करिता रिजनल ऑपरेटीव्ह एक्झेक्युटीव्ह मनोज संतोषकुमार तुलशान यांनी १७ फेब्रुवारी २१
सकाळी ९ वाजता विझीट केली. त्यावेळी तपासणी सुरु असताना काही कामा निमित्ताने राहुल बॅंकेतुन गेला पुन्हा माघारी आला नाही. तरी बॅंकेची तपासणी सुरु असताना काही खाजगी लोकांच्या नावे १२ फेब्रुवारी रोजी लाखोंची रक्कम टाकण्यात आली. त्यानंतर त्यांच्या सहमतीने तीच रक्कम दुसऱ्या खात्यामध्ये वळवण्यात आली.
एस बी आय बॅकेत व्यवहार आहेत त्याचे स्टेटमेंट मागविलेले असता त्यामध्ये दि १२ फेब्रुवारीरोजी ३०-३० लाखाचे सात चेक वठवल्याचे दिसुन आले. पण त्याची बॅंकेत कसलीही नोंद नसल्याने संशय वाढला. अशी एकूण २ कोटी १० लाखाची फसवणुक झाल्याचे दिसुन आले. त्यानंतर गायब झालेल्या व्यवस्थापकाचा शोध घेतला पण तो मिळुन आला नाही. तसेच ज्यांच्या नावे ही रक्कम वळवली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
व्यवस्थापकासह सात जणांवर १९ फेब्रुवारी २१ रोजी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी विनायक गुळाप्पा तोनशाळ ,वय ४६ – हेड संचप्रमुख बंधन बॅंक रा. हेरेकर पार्क, केतकर रोड, कमला नेहरू पार्कजवळ पूणे यांनी फिर्याद दिली होती. याचा तपास आर्थीक गुन्हे शाखेकडुन सहाय्यक पोलिस निरिक्षक नारायण मिसाळ हे करीत आहेत.