तब्बल महिनाभर गैरहजर विस्तार अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
करमाळा समाचार
तब्बल एक महिन्यापासून कामावर हजर न राहिल्यामुळे करमाळा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डीबी बनसोडे यांना गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी निलंबित केले आहे. बनसोडे यांच्याकडे विचारणा करूनही कोणत्याही प्रकारचे उत्तर न मिळाल्याने सदरची कारवाई करण्यात आली.

करमाळा येथील पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी म्हणून डीबी बनसोडे हे कार्यरत आहेत. दिनांक 26 जुलै रोजी नोंदवही तपासली असता एक जुलैपासून ते कारवाई पर्यंत बनसोडे हे गैरहजर आहेत. त्यांनी याबाबत कोणत्याही प्रकारचा अर्ज सादर न करता गैरहजर राहिले आहेत.

यासंदर्भात करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी डीबी बनसोडे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. गैरहजेरी बाबत खुलासा मागवण्यात आला होता. परंतु आज तागायत त्यांच्याकडून कसलाही खुलासा देण्यात आलेला नाही. त्यामुळे गटविकास अधिकारी यांनी आपले अधिकाराचा वापर करीत संबंधित विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.