करमाळासोलापूर जिल्हा

रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे करमाळ्यात धुळीचे साम्राज्य ; नागरीकांच्या आरोग्याला धोका

प्रतिनिधी सुनिल भोसले 

करमाळा शहरांतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने शहरातील नागरीकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या धुळीच्या साम्राज्यामुळे शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहरातील रस्त्यांची तातडीने दुरूस्ती पालीकेने हाती घेवून त्वरीत रस्ते दुरूस्ती करून नागरीकांची धुळीचा विळख्यातून सुटका करावी अन्यथा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर यांचेकडे दाद मागण्यात येवून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे प्रतिपादन करमाळा नगर परिषदेचे नगरसेवक सचिन घोलप यांनी आज येथे केले.

याबाबत सविस्तर माहिती देतांना श्री.घोलप यांनी सांगितले कि, शहरातील सध्या वेताळपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक परीसर, गुजर गल्ली, एस.टी.स्टॅन्ड, संगम चौक ते केत्तुर नाका, पोथर नाकाकडे जाणारा रस्ता, या शिवाय मेन रोड वर देखील सगळीकडे सध्या आडवे तिडवी मोठे खड्डे पडून डांबरीकरण निघुन गेलेले आहे. रस्ते खराब आहेत. शहरातील नागरीकांना धुळीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे. शहरातील नागरीकांना डोळ्यांचे विकार, धुळ श्वसन मार्गात गेल्यामुळे सर्दी, खोकला, डोळे चुरचुरणे इत्यादी त्रास होत आहेत.

 

वाहने चालवितांना अपघात होण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकारापुढे नागरीक त्रस्त आहेत. या सर्व प्रकाराबाबत प्रशासन, व सत्ताधारी मुग गिळून गप्प आहेत. त्यांचे या सर्व प्रकाराकडे प्रचंड दुर्लक्ष आहे. कोरोना काळात नागरीकांना धुळीमुळे आरोग्याचे त्रास होत आहे. त्यामुळे शहरातील धुळीचा बंदोबस्त करावा अन्यथा याबाबत आम्हाला जिल्हाधिकारी सोलापूर, नगरविकास प्रशासन, मुंबई यांचेकडे दाद मागावी लागेल व तीव्र आंदोलन करावे लागेल. रस्त्यांची झालेली दुरावस्था त्याच बरोबर शहरतील नागरीकांना देण्यात येणाऱ्या सुविधा या दर्जेदार द्याव्यात असे श्री.घोलप शेवटी म्हणाले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE