जामखेडच्या मोहा घाटात आगीमुळे झाडे जळाली ; आग विझवण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते आले समोर
जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात मोहा घाटात आग लागल्यानंतर वनविभागासह स्थानीक नागरीक व सामाजीक कार्यकर्त्यानी वेळीच दखल घेतल्याने आगीवर नियंत्रण आणण्यास मदत झाली. रात्री ९ च्या सुमारास लागलेली आग बारा वाजले तरी आटोक्यात आली नव्हती.

दि. २४/१२/२०२० काही ९ च्या सुमारास जामखेड पासून आठ किलोमीटर अंतरावर मोहा घाटातील रेणुका मंदिर डोंगर वरील सर्व झाडांना भयान आग लागल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मोहा येथील माउली बांगर यांचा फोन आला. सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी ताबडतोब वन परिमंडळ अधिकारी अनिल खराडे यांना फोन केला. अनिल खराडे यांनी ताबडतोब वनरक्षक किसन पवार, प्रविण उबाळे,
शामराव डोंगरे, भाऊसाहेब भोगल सोबत त्यांची टीम घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
यावेळी मोहा येथील महादेव बांगर , नाना वाघमारे , तुषार वाघमारे हे आग विझवण्यासाठी प्रयत्न करीत होते. बोर जवळील दोर, वायर पाईप जळून खाक झाले याच वेळी तेथील आग विजल्याने बोरचे नुकसान वाचले याच वेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी , संदेश कोठारी, चेतन सुराणा हे डोंगर चढून आगीतून वर गेले आणि आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी विठ्ठल आण्णा राऊत, आशुतोष छाजेड यांनी मदत केली.
