तालुक्यात सर्वात जास्त गाळपासह क्रमांक एकचा दर देणार – शिंदे
करमाळा – संजय साखरे
करमाळा तालुक्यात कारखाना उभा करताना दुष्काळात उभा राहिला आहे. तरीही आज टिकुन आहे. सुरुवातीला काढलेले २५० कोटींचे कर्ज चालु बंद मुळे आज पुन्हा २५० कोटींवर जाऊन पोहचले आहे. तरीही यंदा क्षमता वाढली आहे. त्यामुळे यंदा तालुक्यात पहिल्या क्रमांकाचा भाव कमलाई देईल असे प्रतिपादन चेअरमन विक्रमसिंह शिंदे यांनी व्यक्त केले.

कमलाभवानी रिफाईंड शुगर्स लि. पांडे ता. करमाळा या साखर कारखान्याचा सहावा गळीत हंगाम शुभारंभ रविवार पार पडला. यावेळी संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे, डायरेक्टर जनरल माढेश्वरी अर्बन बँक चेअरमन अशोक लूणावत, लव्हे चे सरपंच विलास पाटील, करमाळा अर्बनचे चेअरमन कनयालाल देवी, शिवसेना सोलापूर जिल्हा मा. उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील, आदिनाथ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विनय ननवरे, पंचायत समिती सदस्य दत्ता जाधव, माजी सरपंच मानसिंग खंडागळे व प्रगतशील बागायतदार माधवराव खाटमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदरचा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रस्तावीक डायरेक्टर जनरल एच.बी. डांगे, सुजित बागल, राजेद्र बारकुंड, सुर्यकांत पाटील, विलास पाटील, कन्हैयालाल देवी, अशोक लुणावत यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना सुजित बागल म्हणाले, दुष्काळी परिस्थिती असताना, उस खराब, जळलेला असताना वाईट दिवसात कमलाईने सर्वाना तारले उसाचे एक टिपरुही वाया घालवले नाही. त्यामुळे आता कारखान्याना साथ दिली पाहिजे. त्याशिवाय कारखान्यानेही भाव अधिक देण्याचा प्रयत्न करावा पण हे चांगल्या प्रतिचा उस आला तरच शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. पगारींच्या बाततीतही कारखाना चांगले काम करत आहे. थोडा फार उशीर होत असेल तर कामगारांनीही सहकार्य केले पाहिजे. एक वेळ उसाचा हप्ता महिनाभर उशीरा मिळाला तर हरकत नाही पण पगार देण्याचा प्रयत्न करावा. इतर कारखाने साठ पगारी थकले असताना कोणाला वाईट वाटत नाही पण कमलाई एखाद्या महिणा थकला की गावभर चर्चा होते. त्यामुळे योग्य उस घालुन चांगला भाव घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी राजेंद्र बारकुंड, सुजित बागल, दिलीप बागल, सुरज ढेरे, समाधान भोगे, तात्यामामा सरडे, शहाजी झिंजाडे, गणेश सरडे, ब्रम्हदेव राख, अश्पाक जमादार, डॉ. राहुल कोळेकर, विक्रम कुंभार, राजेंद्र पवार आदि उपस्थित होते.