एका हॉटेल वर सुरु होता वेश्या व्यवसाय ; पोथरे, कर्जत तालुक्यातील ग्राहकाचा समावेश
करमाळा समाचार
शहरात एका हॉटेलमध्ये चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर करमाळा पोलिसांनी धाड टाकून हॉटेल व्यावसायिकांसह दोन ग्राहक व तीन महिलांना रंगेहात पकडले. शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन जगताप यांनी फिर्याद दिली आहे.

करमाळा शहरात कर्जत रस्त्यावर मानसी नावाच्या हॉटेलवर वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या पथकाने धाड टाकली. यावेळी हवालदार देवकर, महिला कॉन्स्टेबल शितल पवार, पोलीस कॉन्स्टेबल गवळी, जगताप व अन्य व्यक्ती खाजगी वाहनातून हॉटेल मानसी ते आले या वेळी ग्राहक म्हणून दोघांना पुढे पाठवले. हॉटेल मालक संजय सरोदे हा एक हजार रुपये घेऊन महिला पुरवण्याचे काम करत असल्याचे यावेळी उघडकीस आली.

महिलांकडे यावेळी चौकशी केली असता हॉटेल मालकाला पाचशे तर महिलांना पाचशे रुपयात सर्व सुरू होते. या कारवाईत कर्जत तालुक्यातील खातगाव येथील संभाजी रोटे व पोथरे येथील शंकर खटके दोघेजण मिळुन आले. हॉटेल मालक व ग्राहकांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.