या विडिओत बिबट्या असल्याचा करमाळ्यात केला जातोय दावा ; याबाबत अधिकारी म्हणतात ..
करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बिबट्या ने दोन बळी घेतलेल्या असताना तालुक्यात सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पण दुपारी यासंदर्भात बैठक सुरू असतानाच त्याचा बैठकीपासून पाचशे मीटर अंतरावरच बिबट्या आल्याच्या चर्चेने अधिकाऱ्यांची धांदल उडाली व लोकही भीतीने घरात बसले. तर सिद्धार्थ नगर परिसरातील युवकांच्या ग्रुपनेही हातात काठ्या घेऊन संबंधित दिशेने जात आपल्या परिसरात येऊ नये म्हणून काळजी घेतली. पण बागवान नगर, सिद्धार्थनगर अशा परिसरात बिबट्याचे पुरावे आढळले नसल्याचे तपास अधिकारी धैर्यशील पाटील यांनी सांगितले.

तरी याबाबत बोलताना पाटील म्हणाले की, सर्व नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे योग्य रीतीने पालन करून सकाळी दहा व सायंकाळी 5 नंतर घराच्या बाहेर पडू नये. जेणेकरून बिबट्याला नवीन भक्ष मिळणार नाही. त्यामुळे बिबट्यासाठी रचलेल्या सापळ्याने तो अडकेल. तर बिबट्या हा वाघाप्रमाणेच प्राणी असल्याने एकट्यानेच शिकारही करतो तो बाहेर फिरताना गृप मध्ये फिरत नाही त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नये.

करमाळा शहरात आज सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांसोबत आमदार संजयमामा शिंदे यांनी बैठक घेतली यावेळी बिबट्याला पकडण्यासाठी स्थानीक तसेच कायदेशीर बाबीत आमची तुम्हाला साथ राहिल असे संजयमामानी सांगितले तर शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार मा.समीर माने साहेब, सोलापूर वनपरिक्षेत्र अधिकारी मा.धर्यशील पाटील,डि.वाय.एस.पी.मा.हिरे साहेब, पोलीस निरीक्षक मा.पाडूळे साहेब, लव्ह्याचे सरपंच मा.विलासदादा पाटील,मा.तानाजीबापू झोळ,मा.सुजीततात्या बागल,मा.उध्दवदादा माळी,आशपाक जमादार, मानसिंग खंडागळे,राजेंद्र बाबर व तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील उपस्थित होते.