बीडीओंच्या अंगावर शाई फेकल्याप्रकरणात जेऊरच्या “त्या” तिघांना दिलासा नाहीच
करमाळा समाचार
करमाळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांच्या अंगावर काळा बुका (शाई) टाकण्याचा प्रयत्न झाला केल्या प्रकरणी महिण्यानंतरही संशयीत आंदोलनकर्त्याना दिलासा मिळाला नाही. आज अटकपुर्व जामिनावर सुनावणी झाली यावेळी कोर्टाने नकार दिला आहे. २५ एप्रिल रोजी काळा बुका टाकल्याप्रकरणी जेऊरच्या तीघांवर गुन्हा दाखल आहे.

जेऊर ग्रामपंचायतीमधील गैरकारभार झाल्याचा आरोप करत बालाजी गावडे यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान प्रभारी गटविकास अधिकारी भोंग हे गटविकास अधिकारी कक्षाच्या बाजूला त्यांच्या दालनात अंदोलकांशी चर्चा करत होते. चर्चा सुरु असतानाच अंगावर काळे टाकण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर तेथून त्यांनी पळ काढला होता.

त्यानंतर प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग यांनी करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर शासकीय कामकाज अडथळा केल्याप्रकरणी तीघांवर गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये गावडे, करचे व एक अनोळखी इसम असे तिघं होते. तेव्हापासून ते तिघेही फरार आहेत. यासंदर्भात त्यांनी अटकपूर्व जामीन्यासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर बार्शी येथील जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यावेळी अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.
सरकारी वकील म्हणून ऍड प्रदीप बोचरे, फिर्यादीकडुन यांच्याकडून ऍड निखील पाटील तर तपास अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी जगदाळे हे काम पाहत आहेत. सदरची सुनावणी ही आज दुपारी पार पडली. आता न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे संशयतांना एकतर हजर व्हावे लागेल किंवा पुढील न्यायालयात दाद मागावी लागेल.