करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पुरस्कार विजेत्यांच्या पालकासह वक्ते भावुक ; आयपीएस अंजना कृष्णा यांच्या हस्ते वितरण

करमाळा समाचार

करमाळा येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये उपस्थित मान्यवरांमधील प्रमुख वाक्यांनी केलेल्या मार्गदर्शनावेळी स्वतःही भावुक होत समोर बसलेल्या श्रोत्यांनाही भावुक करणारा प्रसंग नुकताच पाहायला मिळाला. या ठिकाणी उपस्थित प्रमुख पाहुणे आयपीएस अंजना कृष्णा यांनी तरुणांनी वाम मार्गाला भरकटण्यापेक्षा चांगल्या मार्गाने समाजाची सेवा करावी तसेच आई-वडिलांची काळजी घ्यावी असे आवाहन केले. त्या करमाळा येथील केमिस्ट भवन येथे बोलत होत्या.

ब्ल्यु पँथर ग्रुप व ब्ल्यु पँथर सामाजिक बहुद्देशीय संस्था यांच्यावतीने ०४ रोजी वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींना ब्ल्यु पँथर विशेष कार्य गौरव पुरस्कार प्रधान करण्यात आले. या कार्यक्रमाला आय.पी.एस. अंजना कृष्णा (D.Y.S.P) मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच ज्येष्ठ पत्रकार ह.भ.प. बाबुराव हिरडे, जिल्हा परिषद मा. सदस्या राणी वारे, मनसे तालुकाध्यक्ष संजय घोलप, राष्ट्रवादीचे अशपाक जमादार उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या व पुरस्कार मिळाल्यानंतर आभार मानण्यासाठी उभा राहिल्यानंतर डॉ. कविता कांबळे यांनी व्यक्त होताना आई-वडिलांशिवाय जगात काहीच नाही असे सांगत असताना त्यांच्या आठवणीत भावुक होताना दिसल्या. तर मुलाला बॉक्सिंग क्षेत्रात मिळालेला पुरस्कार भेटल्यानंतर माया भागवत याच्याही भावना डोळ्यातुन बाहेर पडल्या. शिवाय ज्या मुलांनी कार्यक्रम आयोजित केला ती चिमुकली एकेकाळी मी शिकवली आहेत ते आता उत्तम प्रकारे काम करत आहेत असे म्हणत संगीता कांबळे याही या ठिकाणी भाऊक होताना दिसल्या. तसेच कशा पद्धतीने भावनिक वातावरणात मुलाला आपण हात नसतानाही कसे घडवले व त्यांच्यासह इतर मुलांना कसे शिक्षण दिले त्यांची यशोगाथा सांगणारी जलतरणपटू सुयश जाधव यांचे वडी श्री जाधव यांचे भाषण अनेकांना भावले.

हा पुरस्कार सोहळा संस्थापक आशुतोष शेलार यांच्या मार्गदर्शन खाली करण्यात आला.या सोहळ्याला बाबा घोडके, पत्रकार प्रशांत भोसले, पत्रकार हर्षवर्धन गाडे, पांढरे मॅडम अन्य मान्यवर उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे आयोजन शंभू आहेर, तुषार बडेकर, संदेश कांबळे, बादल बडेकर,अरबाज पठाण, प्रशांत राजपुरे, अनिकेत नाळे, गुरु गायकवाड, आकाश कुंभार, मंगेश ओहोळ, आकाश धनवे, गणेश झाकणे, नेहाल बडेकर, अभिजीत सूर्यवंशी, सिद्धार्थ ताकतोडे, आकाश दामोदरे, तुषार साखरे, सनी ताकतोडे, सुमित साखरे, मुन्ना बडेकर, अजाण मोगल, आर्यन शेख, महिला सदस्य वंदना कांबळे, प्राची शेलार, विशाखा बडेकर, रोशनी आहेर व ब्ल्यु पँथर ग्रुपचे सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले. पुरस्कार सोहळा केमिस्ट भवन या ठिकाणी संपन्न झाला.

पुरस्कार प्राप्त मान्यवर …
प्रशासकीय क्षेत्रात –
शिल्पा ठोकडे – तहसीलदार करमाळा
गिरीजा म्हस्के – ए.पी.आय करमाळा.

पत्रकारिता क्षेत्रात –
विशाल घोलप – पत्रकार.
शीतलकुमार मोटे – पत्रकार.

सामाजिक क्षेत्रात –
साजिद शेख – माजी सैनिक ॲम्ब्युलन्स.
संतोष वारे – समाजसेवक

शैक्षणीक क्षेत्रात –
हिरालाल पवार – वाय.सी.म अकॅडमी
नवनाथ पारेकर शिक्षक

क्रिडा क्षेत्रात –
सुयश जाधव आंतराष्ट्रीय जलतरणपटू
कृष्णा भागवत. बॉक्सर
मोहन भोसले हॉलिबॉल शिक्षक

कला क्षेत्रात –
साहिल मुलानी गायक

वैद्यकीय क्षेत्रात –
डॉ.कविता कांबळे स्त्रीरोग तज्ज्ञ
डॉ.रोहन जाधव पाटील, एम. डी
यांना पुरस्कार प्रधान करण्यात आले.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE