E-Paperताज्या घडामोडीराजकीय

रोहित पवारांवर केलेल्या टिकेवरुन आ. पडळकरच झाले ट्रोल

करमाळा समाचार – कर्जत / जामखेड

नुकताच सोशल मीडियावर गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावरील मिरजगाव या ठिकाणच्या रस्त्याबाबत वक्तव्य केलं. त्यावरून रोहित पवारांना टार्गेट करण्याचा त्यांचा हेतू होता. पण ट्रॉलर्सने त्यांच्यावरच पलटवार केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्त्याच्या अधोगतीला पवार नव्हे तर केंद्र सरकारच जबाबदार असल्याचे दिसून आल्याने पडळकर यांनी चुकीचा मुद्दा तर हातात घेतला नाही ना असा प्रश्न ट्रोलर्स उपस्थित करीत आहेत. तर माजी मंत्री व आमदार राम शिंदे हे मागील पाच वर्ष आमदार तर खा. सुजय विखे हे विद्यमान खासदार आहेत ते विसरल्याने त्याचीही आठवण करुन दिली.

कर्जत जामखेड चे आमदार रोहित पवार हे वारंवार विविध विषयांसाठी चर्चेत राहिलेले आहेत. तसेच मागील काही काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये ही अनेकांना सल्लेही दिले होते. त्यामुळे अनेक नेत्यांना हे रुचलं नसणार. तसेच पडळकर यांनाही ते तितकंसं पटलेलं नसावं. त्यामुळेच आज दौऱ्यासाठी जात असताना पडळकर हे अहमदनगर टेंभुर्णी मार्गावरून जात होते. त्यावेळी त्यांना मिरजगाव येथील रस्त्यावरील खड्डे दिसून आले. पण रोहित पवार यांच्या मतदारसंघातील खड्डे असल्याचे दाखविण्यासाठी पडळकर उतावळे झालेले.

पण त्यांनी हा रस्ता नेमका कोणत्या विभागाच्या किंवा कोणाकडे असल्याची याची खातरजमा केलेले नसावे असेच ट्रॉलर्स करून उत्तर देण्यात आली. तसेच या रस्त्याबाबत बोलत आहे या रस्त्यावर काही किलोमीटर अंतरावर त्याच तालुक्याचे माजी आमदार व माजी मंत्री राम शिंदे यांचेही गाव जवळच आहे. त्यांनी पाच वर्ष या तालुक्यावर सत्ता असतानाही या रस्त्याचे काम दिसून झाले नव्हते. तर मागील एक वर्षभरात आलेल्या रोहित पवारांकडून ते अपेक्षा करत असल्याने ट्रॉलर्स मे पडळकर यांच्या विरोधातच मोर्चा उघडल्याचा दिसून आला.

पडळकरांच्या या व्यक्तव्याकडे अद्याप तरी रोहित पवार यांनी याकडे फारसे लक्ष दिलेले नाही. विशेष म्हणजे मागील काही दिवसापूर्वी संभाजी ब्रिगेडचे नेते चापडगाव परिसरात अशाच पद्धतीने सोशल मीडियातून रोहित पवारांना नाव ठेवले होते. त्यावेळी मात्र पवार यांनी रस्ता केंद्र सरकारच्या अखत्यारीत असला तरी त्या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न केले होते. आता पडळकर यांना काय उत्तर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE