वाशिंबेतील भैरवनाथ मंदिर चोरीप्रकरणात गावकऱ्यांची आघाडी ; मूर्ती मिळाली
करमाळा समाचार

वाशिंबे येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरातील चोरी प्रकरणांमध्ये गावकऱ्यांना चोरीला गेलेली मूर्ती मिळून आली आहे. सदरची मूर्ती ही मंदिरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर शिंदे यांच्या शेतात मिळून आली आहे. सदरची मूर्तीही आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतात फेरफटका मारत असताना एकास मिळून आली. संबंधित प्रकरणात डॉग स्कॉड बोलवला नसल्याने नेमके तोटे समोर येत आहेत. चोर कोणत्या दिशेने पळाले हे मात्र अद्याप समजले नव्हते. मूर्ती मिळाल्यामुळे कोणत्या रस्त्याने गेले असावे याबद्दल अंदाज व्यक्त केला जात आहे.

चोरीला गेलेल्या मूर्तीच्या अंगावर काही दागिने होते ते दागिने काढून मूर्ती शेतातच टाकून चोरट्यांनी पलायन केले आहे. पोलिसांनी तपास कार्याला सुरुवात केलेली असून अद्याप काहीच धागेदोरे हाती लागलेले नसताना संबंधित मूर्ती गावकऱ्यांना मिळाल्यामुळे तपासात गावकऱ्यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.
वाशिंबे येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरात झालेली चोरी ही अस्थेच्छा विषय असून गावकऱ्यांची आस्था त्याच्या सोबत जोडलेली आहे. या ठिकाणी कोणतीही प्रकारची हलगर्जी ही लोकांच्या भावना दुखावणारी ठरू शकते. चोरी झाल्यानंतर केवळ बोटांचे ठसे घेणारे पथक संबंधित संबंधित ठिकाणी प्राचारण करण्यात आले. परंतु डॉग स्कॉड न आणल्यामुळे या प्रकरणात पाहिजे तितकं गांभीर्याने पाहिले जात नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.


