आंदोलनाचा इशारा वीज वीज पुरवठा सुरु ; १५ जुलै होणार आंदोलन रद्द
करमाळा समाचार –
करमाळा तालुक्यातील पूर्व भागातील वीज पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे दि.१५ रोजीचे आंदोलन तूर्त स्थगित केले आहे अशी माहिती सिना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश बापू नीळ यांनी दिली आहे. पुढे बोलताना श्री नीळ यांनी म्हटले आहे की, पूर्व भागात गेल्या सहा महिन्यांपासून सिंगल फेज व शेती सिंचन वीज पुरवठा फक्त चारच तास चालू होता म्हणून आम्ही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना वारंवार निवेदने देऊन आठ तास वीज पुरवठा सुरू व्हावा म्हणून सातत्याने प्रयत्न करत होतो.

यापूर्वी ही शिवसेना ज्येष्ठ नेते शाहू दादा फरतडे यांनीही या मागणी साठी आंदोलन करू असे निवेदन सादर केले होते व मागील आठ दिवसांपूर्वी शिवसेना नेते दिग्विजय बागल यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांच्या बरोबर एक बैठक घेऊन वीज पुरवठा सुरू करावा यासाठी प्रयत्न केला होता. तरीही वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी तांत्रिक अडचणीमुळे वीज पुरवठा सुरू केला नव्हता.
त्यामुळे आम्ही सर्वच शेतकरी बांधव यांचे वतीने दि.१५/७/२०२१ रोजी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांना कंदील भेट देऊन धरणे आंदोलन करू असे निवेदन दिले होते. त्यामुळेच वीज वितरण कंपनीच्या अधिकारी यांनी तात्काळ आमच्या मागणीचा विचार करून आज पासून सिंगल फेज लाईट चालू केली आहे व शेती पंपाची ही वीज आठ तास चालू केली आहे. त्यामुळे आम्ही नियोजित पुकारलेले आंदोलन मागे घेतले आहे. असे श्री नीळ यांनी वीज वितरण कंपनी जेऊर यांना लेखी स्वरूपात कळविले आहे.

यावेळी शंभुराजे फरतडे, तालुका समन्वयक युवा सेना, दिलीप फरतडे उपसरपंच हिवरे, अतुल नीळ व्हॉईस चेअरमन निमगाव ह., राजेंद्र भोसले अध्यक्ष कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशिय संस्था, अमोल फरतडे, शरद पवार, दत्ता मामा साळुंके,व इतर सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते. शेवटी सतीश नीळ यांनी नीळ वस्ती वर व पूर्व भागात आठ तास वीज पुरवठा सुरू केल्या बद्दल वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले.