यशकल्याणीचे अध्यक्ष गणेश करेंच्या कावळवाडीत काय सुरु आहे ; मोठा गौप्यस्पोट
करमाळा समाचार
कावळवाडीचे सरपंच गणेश करे पाटील यांच्या विरोधात अविश्वासाचा ठरावाची बैठक होण्यापूर्वी सरपंच तथा कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी तातडीची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. त्यापुर्वी मोठी बातमी मिळत आहे. गणेश करे पाटील यांनी आपल्या सरपंच पदाचा राजिनामा दिला असल्याचे सांगितले आहे. नेमके काय घडलेय कावळवाडीत ते दुपारी तीन वाजता कळेल.

सदरच्या अविश्वास ठरावावर ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा 9 ऑगस्ट रोजी बोलवण्यात आली होती. परंतु तत्पूर्वीच करे यांनी बोलावलेली ही पत्रकार परिषदेत चर्चेचा विषय ठरत आहे.

नेमके कावळवाडीत काय चालू आहे. हे या पत्रकार परिषदेतून समोर येण्याची शक्यता आहे. तर अविश्वासाचा ठरावा पूर्वीच करे पाटील नेमका कोणता गोप्यस्पोट करतील याकडे लक्ष लागून राहिले आहे.