पुतणीच्या बाळाला बघायला जात असताना कर्जतच्या महिलेचे गंठण चोरीला ; करमाळा बस स्थानकातील प्रकार
करमाळा समाचार
कर्जतहुन तुळजापूरकडे जात असताना करमाळा येथील बस स्थानकावर दुपारी गर्दीचा फायदा घेत एसटी बस मध्ये चढताना एका महिलेच्या पर्समधून एक तोळा वजणाचे सोन्याचे गंठण व एक ग्रॅम वजनाचे सोन्याची बाळी चोरण्याचा प्रकार आज दुपारी घडला आहे. त्यामुळे तुळजापूर येथे बाळाला पाहण्यासाठी जाण्याचे रहित करावे लागले आहे.

या प्रकरणी अनोळखी महिलेवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कर्जत येथील सुनीता क्षिरसागर या आपल्या जाऊबाई यांच्यासोबत तुळजापूरला पुतणीचे बाळ पाहण्यासाठी निघाले होते. दुपारी बारा वाजता करमाळा बस स्थानकावर उतरले तर साधारण दीडच्या सुमारास करमाळा बार्शी जाणाऱ्या एसटीमध्ये चढत असताना कोणीतरी अज्ञात महिलेने त्यांच्या पर्समधील सोन्याची गंठण व कानातील बाळी काढून घेतली.
सीटवर जाऊन बसल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. त्यावेळी त्यांनी सदर बस चालकाला माहिती दिल्यानंतर बस करमाळा पोलीस ठाण्याच्या दिशेने आणली. यावेळी प्रवाशांची चौकशी करून बस स्थानकातील सीसीटीव्ही चेक केले. यावेळी एक अनोळखी महिला सदर सीसीटीव्ही दिसून आल्याची माहिती मिळत आहे. यावेळी 49 हजार रुपयाचे मुद्देमाल गेल्याची नोंद करण्यात आली आहे.
