करमाळासोलापूर जिल्हा

या भावंडांनी युवकासमोर ठेवला आदर्श ; युवकच कोरोनासोबत लढु शकतो हे दाखऊन दिले

करमाळा समाचार 

आजकाल प्रत्येक ठिकाणीच कोरोना मंडळ तर अनेक जण घराच्या बाहेर येणे टाळतात. दुसऱ्याची मदत करतो तर लांबच नातेवाईकांच्या अंत्यविधीला तसेच मदत कार्याला जाणेही टाळतात. पण हेच बदलत वीट गावच्या भोंग कुटुंबातील बहिण भावांनी अपवाद ठरले आहे. तर त्यांना समाजसेवेसाठी परवानगी देत भोंग दांपत्याने ही आपलं दायित्व पूर्ण केला आहे.

या बहीण & भावाला सलाम आणि नतमस्तक. सध्या कोरोनाचा काळ आहे. आपल्या वीट गावात कोविड सेंटर आज पासुन चालु केले आहे. आणि तेथे डॉक्टर या मेडीकल कोर्स वाले यांची फार गरज असते. आणि अशातच आपण ही गावाचे काय तरी देणे लागतो या सामाजिक भावनेतुन आदरणीय मा श्री राजेंद्र रामदास भोंग ( बापु ) व सौ सविता राजेंद्र भोंग यांची मुलगा व मुलगी चि रूषीकेश व कु रूतुजा शिक्षण मेडीकल कोर्स बी फार्म निर्णय घेतला की जो पर्यंत आपल्या वीट गावात कोविड सेंटर चालु आहे तेवढे दिवस चोविस तास कोरोना पेशंट ची सेवा करायची ते ही अगदी निस्वार्थपणे.

दिवसभर रूतुजा काम करणार तर रात्रभर रूषीकेश डॉक्टर स्टाफ असणारच बरोबर परंतु आदरणीय भोंग साहेब व सविता ताई या दोघांनी आपल्या मुलांना जी संस्काराची शिदोरी दिली आहे. आज तीच संस्काराची शिदोरी आपल्या वीट गावाच्या संकट समयी रूषीकेश व रूतुजा च्या रूपाने कामी आली आहे एवढ नक्की हे फार मोठे कार्य भोंग परिवाराच्या वतीने घडत असुन मनाने अतिश्रीमंत असणार्या भोंग परिवाराचे मनापासुन आभार व धन्यवाद खरच ग्रेट काम — पुन्हा एकदा सलाम भोंग साहेब तुम्हाला.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE