करमाळासोलापूर जिल्हा

माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या वतीने गरीब कुटुंबाना धान्य वाटप

करमाळा समाचार 

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमी वर प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शासनाने कडक निर्बंध लागू केल्याने लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या दरम्यान दैनंदीन मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या गोरगरीबांची रोजगाराअभावी उपासमारीची शक्यता निर्माण झाली.

त्यामुळे सामाजीक बांधीलकीचे भान ठेवत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा शहरालगतच्या संगोबा रोड येथे पाल ठोकून राहणर्‍या डवरी गोसावी समाजाच्या गोरगरीब गरजू कुटुंबांना गहू व तांदुळाचे वाटप करून त्यांना आधार दिला.

या वेळी माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे सह युवानेते शंभुराजे जगताप, माजी नगरसेवक सुरेश इंदुरे, दिगंबर रासकर, उद्योजक संतोष गुगळे, खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष जनार्धन नलवडे, संचालक शहाजी शिंगटे, अमोल परदेशी आदी उपस्थित होते .

मागील वर्षीही जगताप यांनी गोरगरीब कुटुंबांना मदत म्हणून धान्य वाटप केले होते. यंदा पुन्हा एकदा अडचणीत सापडलेल्या गोरगरीब गरजू कुटुंबांना त्यांची गरज लक्षात घेऊन सहकार्याची भावना दाखवली. त्यामुळे सर्व कुटुंबांना एक आधार मिळाला आहे. जगताप यांच्या प्रमाणे इतरांनीही दातृत्व दाखवण्याची हीच वेळ असल्याने दानशूर व्यक्तींनी समोर आले पाहिजे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE