E-Paperकरमाळासोलापूर जिल्हा

फेसबुकवर बनावट जाहीरातीच्या माध्यमातून वाशिंब्यातील युवकाची फसवणुक ; करमाळ्यात गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

फेसबुकच्या माध्यमातून वाशिंबे येथील सोमनाथ झोळ यांची फसवणूक झाली असून तब्बल एक लाख 47 हजार रुपये मोजावे लागले आहेत. सदरची फसवणूक की फेसबूक च्या माध्यमातून करण्यात आली आहे. फेसबुक वर या कंपनीचे पैसे गुंतवणुकीबाबत जाहिरात पाहून त्याबाबत गुंतवणूक करण्यासाठी झोळ यांनी पुढाकार घेतला होता.

झोळ यांनी फेसबूक वर FOREX BIZ या कंपनीची पैसे गुतवणुक बाबत जहिरात पाहिली. त्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीच्या एकूण रक्कमेपैकी दिवसाला 5 टक्के रक्कम हि परतावा म्हणून 40 दिवस देणार असल्याचे पाहिले तसेच युटयुब लिंक https://youtu.be/cMISErJaROU सदरची जाहिरात पाहिली. सदर FOREX BIZ या कंपनीचा एम डी अजय मोहरा असल्याचे नाव सांगितले.

सदर कंपनीकडे फोन पे वरुन दिनांक 17/03/2021 रोजी सदर खात्यामध्ये 50,000/-रुपये भरले. त्यावेळी कंपनीच्या FOREX BIZ या अप्लीकेशनवर सदर रक्कम जमा झालेबाबत मेसेज आला होता. दिनांक 18/03/2021 रोजी सदर रक्कमेच्या 5 टक्के परतावा रक्कम म्हणून 2500/- रुपये रक्कम मिळाली, म्हणुन त्याच दिवशी कंपनीचे खात्यावर 40,000/- रुपये भरले. तसेच दिनांक 19/03/2021 रोंजी एकूण रक्कमेच्या 5 टक्के परतावा रक्कम म्हणून 4500/-रुपये मिळालेने त्याच दिवशी झोळ यांनी 50,000/-रुपये सदर कंपनीच्या खात्यामध्ये भरले. दिनांक 20/03/2021 रोजी एकूण रक्कमेच्या 5 टक्के परतावा रक्कम म्हणून मला कंपनीकडुन माझे खात्यावर 7000/- रुपये जमा झाले. दिनांक 22/03/2021 रोजी कंपनीच्या सदर खात्यामध्ये 8000/- रुपये भरले.

त्यानंतर सदर कपंनीच्या अप्लीकेशन वर जावून परतावा रक्कम परत आली का असे चेक केले असता दिनांक 28/03/2021 रोंजी पर्यंत सदर अप्लीकेशनवर प्रोसेस पेंडींग असे दाखवित होते. दिनांक 22/03/2021 रोजी पर्यंत कंपनीच्या वरील खाते नंबरवर एकूण 1,47,000/- रुपये जमा केले होते. त्यापैकि मला सदर रक्कमेवर परतावा म्हणुन 14,000/- रू. रक्कम परत मिळाली आहे. दिनांक 29/03/2021 रोजी सदर अप्लीकेशन बंद झाले असून ते चालत नाही तरी सदर अप्लीकेशन मध्ये खातेवर जमा केलेली परत मिळणेबाबत कंपनीचे सपंर्क क्रमांक 7206392475 यावर फोन केला असता त्यांनी अजय मेहरा बोलत आहे असे सांगुन त्यांना  पैसे परत कधी मिळतील असे विचारपुस केली असता त्यांनी मला 5 ते 6 दिवस सदरची सार्इट मेन्टनन्स साठी बंद आहे त्यांनतर ती रेग्युलर चालू होर्इल असे कळविले होते. पण अद्याप पर्यत पैसे आले नाही म्हणुन फसवणुक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसात तक्रार केली आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE