करमाळाराजकीयसोलापूर जिल्हा

पंचायत समीतीचे उपसभापती दत्तात्रय सरडे यांचा राजीनामा

करमाळा समाचार 

पंचायत समितीला काही महिने उरले असताना आता सभापती नंतर उपसभापती फेरबदल केले जात आहेत. उपसभापती दत्तात्रय सरडे यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला असून त्यांच्या जागी केशरताई चौधरी यांची निवड होणार असल्याची माहिती समोर येत आहे. सरडे यांनी राहिनामा दिला आहे अद्याप पुढील कार्यवाही झालेली नाही.

पंचायत समितीच्या निवडणुका नंतर सुरुवातीला सभापती म्हणून शेखर गाडे व उपसभापती गहिनीनाथ ननवरे यांनी काम पाहिले होते. अडीच वर्षाच्या कार्यक्रमानंतर सभापतिपदी गहीनीनाथ ननवरे यांची वर्णी लागली. तर त्यावेळी उपसभापती म्हणून पैलवान दत्तात्रय सरडे यांची निवड झाली होती. 31 डिसेंबर 2020 पासून उपसभापती सरडे हे कार्यरत होते.

*आश्चर्यकारक-* सरपडोह गावाने कामातुन करुन दाखवले. केलेल्या कष्टाला फळ मिळु लागले आहे. पाणी फाऊंडेशनमुळे बदल घडत आहेत. ते आता पटु लागले आहे.

मध्यंतरी सभापती निवड होऊनही दत्तात्रय सरडे हे पदावर कायम होते. निवडणुकांसाठी काही कालावधी शिल्लक असल्यामुळे या निवडी होते का नाही अशी शंका होती. परंतु दत्तात्रय सरडे यांची यांनी पदभार सोडला असून आता नव्याने केशर चौधरी यांची निवडीची शक्यता वर्तवली जात आहे.

आपण नारायण पाटील गटाचे कट्टर समर्थक व साधारण कार्यकर्ते होतो. भुमिहिन शेतकऱ्याला नारायण पाटील गटाने उपसभापती पदापर्यंत येऊन पोहोचले हा मान फक्त याच गटात मिळू शकतो. शिवाय आपण सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देऊ शकलो. आपल्याला ती संधी मिळाली यात आपण सामान्य आहोत. तरी इथून पुढेही गटाच्या वतीने ज्या संध्या दिल्या जातील त्या अशाच पेलत गटाला प्राधान्य देऊ.
– दत्तात्रय सरडे, उपसभापती, पंचायत समीती करमाळा .

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE