करमाळासोलापूर जिल्हा

रेल्वे रुळावर शिक्षकाचे मृत शरीर मिळाल्याने खळबळ ; आत्महत्या का घातपात तपास सुरु

प्रतिनिधी – करमाळा 

पोफळज ता. करमाळा येथे रेल्वे रुळावर एका व्यक्तीचे मृत शरीर मिळून आल्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे. सदरचा व्यक्ती कोण हा तपास लागत नसल्याने शोध घेण्याचे काम सुरू होते. तरी त्याजवळ एटीएम कार्ड , मोबाईल अशा वस्तू मिळवून आल्याने तो सदर व्यक्ती हा करमाळा नगर परिषदेचे शिक्षक असल्याचे बोलले जात आहे. त्यात प्राथमिक माहितीनुसार रात्री अडीचच्या सुमारास हे मृत शरीर मिळून आले आहे.

किशोर भागवत (वय 48) असे त्या शिक्षकाचे नाव असून अधिक माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार सदरचे शरीर हे भागवत यांचे असल्याचे बोलले जात आहे. रात्री च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. सदरचा मृत्यू आत्महत्या का घातपात असेल हे तपासले जात आहे. हा तपासाचा भाग असला तरी आता मृत शरीर हे शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर त्या मृत शरीराजवळील मोबाईल व एटीएम कार्ड ची माहिती घेतली असता भागवत यांचे असल्याची कळले आहे.

रेल्वे समोर उभा राहून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर धडकेत जोरदार धडक बसल्याने त्यांच्या चेहऱ्याची ओळख पटत नाही. तर पायही तुटलेला आहे. त्यामुळे नेमकी मृत शरीर ओळखू येणे अवघड झाले होते. तरी नातेवाईक व परिसरातील मंडळींना बोलवून सदर शरीराची माहिती घेण्यात आली. सदर माहितीच्या आधारे ते भागवत गुरुजीच असावेत असा अंदाज काढला जात आहे.

भागवत गुरुजी अतिशय धाडसी वृत्तीचे असल्याने ते असा काही प्रकार करतील असे कोणालाच वाटत नाही. त्यामुळे नेमका हा प्रकार कशातून घडला व कधी घडला हा अजूनही प्रश्नचिन्हच आहे. त्यामुळे पोलीस तपास सर्व गोष्टी उघड करतील. घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस ठाणे करीत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE