करमाळासोलापूर जिल्हा

केळी उत्पादक शेतकरी संघच्या तालुका अध्यक्षपदी वैभव पोळ

समाचार टीम

शेटफळ ता करमाळा येथील प्रगतिशील शेतकरी
लोक विकास फार्मस् प्रोड्यूसर कंपनीचे संचालक व ,नागनाथ शेतकरी गटाचे सचिव वैभव वसंतराव पोळ यांची केळी उत्पादक शेतकरी संघ महाराष्ट्र राज्यच्या तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

या संघाचे अध्यक्ष किरण चव्हाण व उपाध्यक्ष राहुल बच्चाव यांनी त्यांच्या गटशेतीच्या माध्यमातून या क्षेत्रातील आजपर्यंतच्या योगदान लक्षात घेऊन त्यांना पद निवडीचे पत्र दिले आहे.पुढील काळात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करणार असल्याचे त्यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले त्यांच्या निवडीबद्दल विविध क्षेत्रातील लोकांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE