करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

खुशखबर! आता नगरपरिषद शाळेत भरणार पाचवीचा वर्ग ; मुलींच्या एक नंबर शाळेला 5 ते 8 वी मान्यता

करमाळा:

करमाळा नगरपरिषदेची पीएमश्री साधनाबाई नामदेवराव जगताप प्राथमिक मुलींची शाळा क्र. १ येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. मुलींसाठी सुरक्षित, सुसज्ज व आधुनिक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देणाऱ्या या शाळेत बालवाडी ते पाचवीपर्यंत (सेमी इंग्रजी माध्यम) प्रवेश दिले जात आहेत.

शाळेला बालवाडीपासून इयत्ता आठवीपर्यंत मान्यता मिळालेली असून यावर्षी इयत्ता पाचवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून इयत्ता सहावी, सातवी व आठवीचे वर्ग टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शाळा प्रशासनाने दिली.

विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत सीसीटीव्ही युक्त सुरक्षित परिसर, चौथी इयत्तेसाठी शिष्यवृत्ती मार्गदर्शन, नवोदय व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी, शुद्ध आरओ पाण्याची सुविधा, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम, विज्ञान प्रदर्शन, संगणक व भाषा प्रयोगशाळा तसेच शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.

ad

गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कार व मूल्याधिष्ठित शिक्षणावर विशेष भर देण्यात येत असून विद्यार्थिनींना आधुनिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने पालकांनी आपल्या मुलींचा प्रवेश लवकरात लवकर निश्चित करावा, असे आवाहन मुख्याध्यापक श्री. दयानंद चौधरी यांनी केले आहे.
संपर्क :
श्री. दयानंद चौधरी (मुख्याध्यापक)
मो. ९९७५७८००१३

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE