करंज्याच्या एकाने करमाळ्याच्या व्यापाऱ्याचे १४ लाख लांबवले ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार –
करमाळ्यातील बस स्थानाकासमोर उभारलेल्या व्यापाऱ्याच्या जवळील रक्कम असलेली बॅग चोरुन नेल्या प्रकरणी करंजे येथील एकावर करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बॅग मध्ये तब्बल 14 लाख रुपये यांची रक्कम असून आरोपीचा तपास घेत आहे. शरद पवार रा. करंजे असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

करमाळा येथील श्री कात्रेला स्टेशनरी दुकान रा.मेनरोड करमाळा ता.करमाळा यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. दिनांक 27/10/2022 रोजी दुपारी 03:30 वाचे सुमारास करमाळा शहरातील बस स्टॅण्डचे समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.

अधिक माहीती अशी की, दिनांक 27/10/2022 रोजी दुपारी 03:30 वाचे सुमारास करमाळा शहरातील बस स्टॅण्डचे समोरील रस्त्यावर फिर्यादी व त्याचा मित्र सचिन पांढरे असे मिळुन त्याचे कडील इंरटिका मोटार कार क्र एम एच 13 बी एन 4138 यामध्ये चहा पिण्यासाठी बोलत बसले असताना फिर्यादीचे ओळखीचा इसम नामे शरद पवार रा.करंजे ता.करमाळा याने फिर्यादीचे ताब्यातील रोख रक्कम 14,00,000/- रुपये ठेवलेली बॅग ही फिर्यादीचे संमती वाचुन, मुद्दाम, लबाडीने चोरुन घेवुन गेला आहे.
फिर्यादीची शरद पवार रा.करंजे ता.करमाळा जि.सोलापुर यांचे विरुध्द तक्रार दाखल केल्यानंतर पोलिस संबंधित आरोपीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी काही धागेदोरे पोलिसांचा हाती लागले असुन त्या दिशेने तपास सुरु आहे. सदर घटनेचा तपास हवालदार उबाळे हे करीत आहेत.