करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचा कॉग्रेसला रामराम ; शिवसेनेत प्रवेश

करमाळा समाचार

माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे पुत्र तसेच करमाळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी नुकताच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती मिळत आहे. बऱ्याच काळापासून ते काँग्रेसची संलग्न होते तर काँग्रेसचे नगराध्यक्ष म्हणून त्यांची एक चांगली ओळख निर्माण झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नगराध्यक्ष वैभव जगताप व उपनगराध्यक्ष अहमद कुरेशी यांच्या हस्ते शिवबंधन बांधले आहे.

वैभवराजे जगताप यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील राजकारणाची बरेचशे गणित बदलणार असल्याची दिसत आहे. मागील विधानसभेपूर्वी बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु बऱ्याच दिवसापासून ते कोणत्याही पक्षात नसल्याचे दिसून येत आहेत. तर शिवसेनेपासून थोडेसे अलिप्त झाल्याचेही दिसत आहेत. त्यांची जवळीक शिंदे गट तसेच भाजपची असल्याचे चर्चा होत्या. त्या दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटात जी पोकळी निर्माण झाली होती. त्यात प्रवेश करून वैभवराजे जगताप यांनी नव्या राजकारणाची सुरुवात केल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसमध्ये प्रतापराव जगताप यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लागली होती. तर काँग्रेसच्या माध्यमातून मागील निवडणुकीत माढा करमाळा विधानसभा मतदार संघ युवक कॉग्रेस अध्यक्षच्या निवडणुकीत वैभवराजे जगताप यांची निवड झाली होती. प्रतापराव जगताप व वैभव राजे जगताप या दोन्ही मध्ये तितकस अलबेल नाही हे सर्वशृत आहे. त्यामुळेच वैभव जगताप यांनी हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE