करमाळ्यात नारायण आबा पाटील १६ हजारांनी विजयी
करमाळा समाचार
करमाळा विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला असून विद्यमान आमदार यांचा 16019 मतांनी पराभव करीत नारायण आबा पाटील यांनी विजय मिळवला आहे पाटील यांना तब्बल 96 हजार 91 मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या शिंदे यांना 80 हजार सहा मतांवर समाधान मानावे लागले आहे. दिग्विजय बागल हे करमाळा तालुक्यात उत्तमरीत्या लढत देत असल्याचे दिसून आले.
करमाळा तालुक्यात विधानसभा मतदारसंघ अतिशय अटीतटीच्या असा सामना होणे अपेक्षित असताना करमाळा तसेच माढा तालुक्यातील छत्तीस गावांमुळे नारायण पाटील यांचा विजय अगदी सोपा झालेला दिसून आला. तालुक्यात जवळपास 18 व्या फेरीपर्यंत नारायण पाटील यांनी 31 हजार मतांची आघाडी घेतली होती. तर संपुर्ण फेरी संपेपर्यत केवळ 15 ते 17 हजारांनी ते मताधिक्य कमी होऊ शकले. त्यामुळे पाटील हे सहज विजयी झालेले दिसून आले.
तालुक्यात पक्ष, सहकारी व इतर बलाढ्य नेत्यांनी साथ सोडल्यानंतरही संजय मामा शिंदे यांनी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर मते मिळवीत संघर्ष चालू ठेवला होता. अखेरीस छत्तीस गावातून अपेक्षित असे सहकार्य न मिळाल्याने व करमाळा तालुक्यात झालेली पाटील यांची वाढ यामुळे शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.