करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

पिसाळलेल्या कुत्र्याचा बालकावर हल्ला ; मुलगा गंभीर जखमी मुलाला ११३ टाके

करमाळा


पिसाळलेल्या कुत्र्याने आकरा वर्षाच्या मुलावर हल्ला करुन त्याला गंभीर जखमी केले आहे. गौरव तुकाराम जवंजाळ असे मुलाचे नाव आहे. सदरचा मुलगा करमाळा तालुक्यात्रेल देलवडी येथे रहात आहे. तर सहावी वर्गात शिक्षण घेत आहे. २४ जुन रोजी मंगळवारी पहाटे घराबाहेर अंगणात झोपलेला असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्याला चावा घेऊन फरपटत नेले अशी घटना घडल्यानंतर मुलास राशीन येथे दवाखान्यात उपचार सुरु आहेत.

जवळपास अर्धा तास हा पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला चढवला होता. यावेळी बालकाची आई कौशल्या तुकाराम जवंजाळ हिने या कुत्र्याला मारहाण करून दगड काट्या घालून त्यापासून आपल्या मुलाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला. पण पिसाळलेला कुत्रा एका बाजूने तो मुलाला वडायचा तर दुसऱ्या बाजूने आई. या दुर्दैवी घटनेत बालकाला जवळपास ११३ टाके पडले आहेत. या बालकाला अंकुर बाल रुग्णालय राशिन येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय कुत्र्याने दुसऱ्या दिवशी देलवडी गावात जवळपास १५ नागरिकांना चावा घेतला, परत तो भिलारवाडी या गावात गेला तेथे त्याने दहा ते पंधरा शेतकऱ्यांना चावा घेतला अशी माहीती मिळत आहे शेवटी भिलारवाडी ग्रामस्थांनी त्याला पकडून मारले.

संपर्क साधा .. पिसाळलेले कुत्रा चावल्यानंतर लागणारी सर्व इंजेक्शन व औषधोपचार उपजिल्हा रुग्णालयात सुरू केली असून चावा घेतल्यामुळे रेबीज प्रतिबंधक उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात येऊन इंजेक्शन घेऊन जावे. इंजेक्शन मिळण्यास कुठली अडचण आल्यास शिवसेना कार्यालयाशी संपर्क साधावा.
महेश चिवटे
शिवसेना जिल्हाध्यक्ष.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE