करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आधी मांगीत पाणी आणा नंतर पाणी न्यायचा विचार करा ; भाजपा नेत्या रश्मी बागल यांचा पाण्यावरुन संताप

करमाळा समाचार

नुकतच जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पिण्यासह पीक प्रात्यक्षिकास होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेस तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. त्यावर भाजपाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मी बागल यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

याबाबत अधिक माहिती देताना बागल म्हणाल्या की, मुळातच मांगी प्रकल्पातील पाणीवाटप पूर्ण झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांना आधीच पाणी उपलब्ध होत नाही. शिवाय ज्या योजना मधून मांगी प्रकल्पात पाणी आणले जाते त्या योजनेतुन आधीच पाणी मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना हालाखीची परिस्थितीतून जावे लागत आहे. त्यातच संबंधित योजना मांगी प्रकल्पाच्या माथी मारणे चुकीचे असून यासंदर्भात आपण वरिष्ठांशी बोलून सदर योजना कशा पद्धतीने चुकीची आहे हे पटवून देऊ.

यामुळे मांगी व परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यासाठी आधी मांगी प्रकल्पाची क्षमता वाढवा व त्याच्यात पाणी आणून त्याचे वाटप करा अशी आपली मागणी आपली राहणार आहे असे न झाल्यास तालुक्यातील मोठा जनक्षोभ उत्पन्न होईल. आधीच पुरग्रस्त परिस्थिती मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा पद्धतीने भुमिका घेताना करमाळावासियांना विचारात घेणे गरजेचे होते असेही त्या म्हणाल्या आहेत.

नेमके प्रकरण काय आहे …
जामखेड तालुक्यातील हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय कृषी महाविद्यालयाला करमाळा तालुक्यातील मांगी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा योजना राबवण्यास तत्वतः मान्यता मिळाली असल्याची वृत्त प्रसिद्ध झाले होते. तेव्हापासून मांगी प्रकल्पावर आधारित शेतकऱ्यांवर असंतोष निर्माण झाला आहे. सदर बैठकीला विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते. बैठकीत मागील मध्यम प्रकल्पातून महाविद्यालयास पिण्यासाठी 0.036 दशलक्ष घनमीटर व प्रक्षेत्र सिंचनाखाली 0.41 दशलक्ष घनमीटर पाणी उचलण्यास मान्यता देण्यात दिली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE