शाळा व्यवस्थापन समीतीच्या पुढाकारातुन एक लाख ८१ हजारांचे सहकार्य
करमाळा समाचार

जि. प. प्राथमिक शाळा केत्तूर-२ या शाळेची नुकतीच शा. व्य . समितीची निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्ष म्हणून श्यामल अमोल खाटमोडे व उपाध्यक्ष म्हणून पूजा ज्योतीराम ढवळे यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष यांनी 75 हजार व उपाध्यक्ष यांनी 31 हजार अशी शाळेला प्लेव्हर ब्लॉक्स टाकण्यासाठी भरघोस मदत दिली यावेळी एकुण 1लाख 81हजार रुपये गोळा झाले.

या प्रसंगी सदस्य म्हणून निशा नवले, चैत्राली जरांडे, माया धुमाळ,मदिना शेख, रूपाली महामुनी, सुहास जाधव, योगेश कनिचे, महेश येवले, योगेश देवकते, संदीप बाबर, नारायण ननवरे, सचिन निंभोरे (शिक्षणतज्ञ) तर कमल पवार (ग्रा.पं.सदस्य) यांची शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यपदी एकमताने निवड झाली. या सर्व सदस्यांनी शाळेला योगदान म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपये शाळा विकास निधी दिला.
या सर्वांचा सन्मान सचिव तथा मुख्याध्यापक पानसरे मॅडम यांनी केला. पालकांनी शाळेच्या भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांची गुणवत्ता याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी येडे सर, शितोळे सर, निकत सर व निकम मॅडम उपस्थित होते. तर पालकही बहुसंख्येने उपस्थित होते.


