करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

माधुरी इवरे-पवार यांच्यावतीने वृक्ष-सखी परिवारास १०१ रोपांची भेट

करमाळा

निसर्ग संवर्धन आणि वृक्षसंवर्धनाचा जागर मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर अधिकच बळावला असून, याचे उत्तम उदाहरण माधुरी इवरे-पवार यांनी ठेवले आहे.
वृक्ष-सखी परिवाराच्या मुख्य प्रवर्तक माधुरी जयेश पवार यांनी शीतलताई गणेश करे-पाटील यांच्यासह नावीन्यपूर्ण उपक्रमद्वारे समाजासमोर पर्यावरण रक्षणाचा संदेश देत फळझाडे, औषधी वनस्पती तसेच शोभेच्या झाडांसह एकूण १०१ महिलांना रोपांचे वाटप केले.

राजमाता जिजाऊ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे पूजन शीतलताई करे-पाटील यांच्या हस्ते करून हा सोहळा सुरू करण्यात आला

मकर संक्रांती म्हणजे केवळ सण-उत्सव नव्हे तर नव्या संकल्पांची सुरुवात; या भावनेतून निसर्गाशी नाते अधिक घट्ट व्हावे, प्रत्येकाच्या अंगणात हिरवळ फुलावी आणि पुढील पिढीसाठी शुद्ध पर्यावरण जपले जावे या उद्देशाने मकरसंक्रांतीचे औचित्य साधत हा उपक्रम राबविण्यात आला.
रोपांचे वर्षभर यशस्वीरित्या संगोपन करणाऱ्या सखींचा (महिलांचा) विशेष सन्मान पुढील वर्षी मकरसंक्रांतीवेळी करण्यात येणार असल्याचे माधुरी जयेश पवार यांनी सांगितले.
फळझाडांमुळे पोषणमूल्य वाढेल, औषधी वनस्पती आरोग्यास उपयुक्त ठरतील, तर शोभेची झाडे परिसराचे सौंदर्य वाढवतील, असा दुहेरी लाभ या उपक्रमातून साधला जाणार आहे.

या उपक्रमास पर्यावरणप्रेमी महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक लाभार्थ्याने स्वीकारली असून, “माझे रोप – माझी जबाबदारी” हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

माधुरी इवरे-पवार यांच्या वृक्ष-सखी परिवाराचा हा उपक्रम समाजात पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणारा ठरत असून, सण साजरे करतानाच निसर्गसंवर्धनाचा विचारही तेवढ्याच जबाबदारीने करावा, असा प्रेरणादायी संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सौ. शीतलताई गणेश करे–पाटील, साहित्यिका अंजली श्रीवास्तव, वृक्षप्रेमी सौ. प्रियंका सागर गायकवाड सौ. मोहोळकर अक्का शिंदे तसेच करमाळा येथील सा.ना.जगताप प्रशाला मुली क्र. 1 मधील सर्व शिक्षिका यांचे सहकार्य व सक्रिय सहभाग लाभला

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE