आ. रोहित पवारांच्या शिलेदारासाठी एकवटले विरोधक ? ; दिग्गज नेत्याच्या माघारीची शक्यता !!
करमाळा समाचार

करमाळा तालुका राजकारणाला मोठ्या प्रमाणावर घडामोडी घडत आहेत यात मोठे वळण सध्या घेताना दिसून येत आहे दिग्गजांची आजच्या दिवशी माघार होऊ शकते. त्यामध्ये कोर्टी गटाची मोठ्याप्रमाणावर चर्चा सुरु आहे. कोर्टी गटातील दिग्गज नेत्याचा समावेश असू शकतो. मुळातच या ठिकाणी अनपेक्षित अशा घटना घडलेल्या दिसून आलेल्या आहेत. यामध्ये मोहिते पाटील व आमदार नारायण पाटील यांनी स्वतंत्र उमेदवार दिल्याने एक प्रकारे रोहित पवार यांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे यांना फायदा होताना दिसून येत होता.

सध्या मोठ्या प्रमाणावर राजकीय हालचालींना वेग आला असून या ठिकाणी जोरदार खलबते सुरू आहेत. प्रमुख उमेदवारांपैकी एक उमेदवार माघार घेऊन सदरची निवडणूक एक प्रकारे सोपी करण्याची शक्यता याठिकाणी नाकारता येत नाही. झालेल्या घडामोडीमुळे कोर्टी गटासह दोन्ही गटांमध्ये अतिशय तणावाचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका दिग्गज नेत्यांना बसू शकतो. हे माहित असल्यामुळे यातून माघार घेऊन विशिष्ट गटाला अडचणीत आणण्याचे काम केले जाऊ शकते.
यापूर्वी सदरच्या गटामध्ये सुभाष गुळवे यांच्या पत्नी मैदानात उतरलेल्या असताना सुभाष गुळवे हे राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांचे निकटवर्ती असून बारामती ऍग्रो उद्योगाचे ते उपाध्यक्ष आहेत. तर या ठिकाणी यापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी मधून त्यांना तिकीट मिळाले असून ते मैदानात दाखल झाले. यामुळेच त्यांच्यासोबत या निवडणुकीत भाजपाच्या बागल असल्यामुळे भाजपाचाही आपसूक पाठिंबा त्यांना मिळालेला आहे. शिवाय माजी आमदार जयवंतराव जगताप शिवसेने सोबत काम करत असून त्यांनीही गुळवे यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे रोहित पवार यांच्या निकटवर्तीयासाठी वेगवेगळी पक्षीय नेते एकत्र आले आहेत असे चित्र दिसून येत आहे.



