करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

सीना नदी पात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक ; तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची कारवाई

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यातील सीना नदी परिसरातील पाणी ओसरल्यानंतर वाळू माफिया सक्रिय झाला आहे. यामध्ये परांडासह करमाळा तालुक्यातील वाळू चोरांचा सहभाग आहे. महसूल विभागाने त्यांच्या विरोधात कडक करवाई सुरु केली आहे. दरम्यान बीटरगाव श्री येथे महसूल विभागाकडून कारवाई करत एक ट्रॅक्टर ताब्यात घेतला असून सोळा ब्रास वाळूसह ट्रॅक्टर जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई 15 मे रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पथकाने केली आहे.

मागील वेळी पुरामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू वाहत आल्याने सीना नदीत मुबलक वाळूचा साठा दिसून येत आहे. यामुळे वाळू माफियाची चांदी होत असल्याचे दिसायला मिळत आहे. ज्या भागात पाणी ओसरले आहे तेथून वाळू उपसा करण्यासाठी संबंधित वाळू माफिया समोर आले आहेत. करमाळा व परांडा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या सीना नदीपात्रातून वाळू उपसा सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर परंडा भागातील वाळू माफियांसह करमाळा तालुक्यातील काही लोकांचा समावेश आहे.

करमाळा येथील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या पथकातील पोथरे गावचे तलाठी हर्षल शेंगळे, पोटेगावचे तलाठी विवेक चिंतामणी, बिटरगावचे तलाठी आदित्य मस्तुद, बिटरगावचे पोलीस पाटील शोभा अभिमन्यू यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी रात्रीची गस्त घालत असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास दोन चाकी ट्रेलर सह एक ट्रॅक्टर वाळू वाहतूक करत असताना ताब्यात घेतला आहे. सदरची वाळू चोरी ही बिटरगाव श्री येथून जिल्हा परिषद शाळे समोरून केली जात होती. यामध्ये ट्रॅक्टर चालक दादासाहेब मुरूमकर यांचा समावेश आहे. इतरांचीही माहिती घेणे सुरु आहे.

प्रतिक्रिया
तर अशा प्रकारच्या वाळू चोरीवर पुढेही कारवाई सुरू ठेवली जाईल व संबंधित वाळू चोरांवर कडक कारवाई केली जाणार आहे. आमच्या पथकाकडून कायम देखरेख सुरू असून लोकांनीही माहिती कळवणे गरजेचे आहे. आमच्या भागातील मिळून येणारी वाळू ही घरकुलांसाठी देण्याचं नियोजन असून वाळू चोरांमुळे घरकुलधारकांचे नुकसान होऊ शकते.
-आदित्य मस्तुद, तलाठी बिटरगाव श्री.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE