जलसंपदा विभागातील रुक्मिणी माने-सस्ते यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६”
शिर्डी :

“Be The Change Foundation” आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२६ मध्ये जलसंपदा विभागात कालवा निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सौ. रुक्मिणी गणेश माने-सस्ते यांना “राज्यस्तरीय महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार २०२६” प्रदान करून गौरविण्यात आले.

शासन, प्रशासन व सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे व कर्तव्यनिष्ठेने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिर्डी येथील साई पालखी निवारा येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील गुणवंत व्यक्तींना सन्मानित करण्यात आले.
सौ. रुक्मिणी माने या सहाय्यक कृषी अधिकारी श्री. गणेश माने यांच्या पत्नी तसेच रामलिंग सस्ते (निवृत्त रेल्वे कर्मचारी) यांच्या कन्या आहेत. आपल्या कार्यतत्परतेमुळे, सेवाभावी वृत्तीमुळे आणि उत्कृष्ट प्रशासनिक कामकाजामुळे त्यांनी विशेष ओळख निर्माण केली आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरुण भंडारे, निवेदिता पगार, संजय वाबळे, शुभांगी थोरात, सर्जेराव मुंढे, अमृत रोहोम तसेच स्वप्नील आंब्रे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष मयूर ढोकचौळे व सचिव रचना ढोकचौळे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती दर्शवली. सौ. रुक्मिणी माने-सस्ते यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

