करमाळाकृषीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पावसाने लाज राखली ; दुसऱ्या पुढाऱ्यांच्या तुलनेत आपल्यांना आत्मपरीक्षणाची गरज !

करमाळा समाचार

ज्या पाण्याचे कारण सांगून उजनी पट्ट्यातील केवळ करमाळा तालुक्यातील वीज कपात केली होती. आता त्याच पट्ट्यात पाऊसही सुरू आहे आणि उजनीत येणाऱ्या पाण्याची टक्केवारी ही वाढत चालली आहे. अखेर देवानेच शेतकऱ्यांचे गाऱ्हाणं ऐकलं हा आणि शेतासह उजनीतही पाणी पाठवून दिले. पण अजूनही प्रशासनाला पाझर फुटताना दिसून येत नाही. यातून तालुक्याच्या नेते मंडळींना आत्मपरीक्षणाची गरज असल्याचे दिसत आहे.

एकच जलाशय, एकच परिसर, एक सारखेच शेतकरी व एकसारखेच पाणी तरीही इतर तालुक्यांच्या तुलनेत करमाळा तालुक्यावर मात्र अन्याय होताना दिसत आहे. एवढंच काय तर आपल्या जिल्ह्याला वेगळा नियम असला तरी माढा तालुका आणि करमाळ्यातही फरक दिसत असल्याने शेतकरी हवालदिन झालेला दिसून आला. पुणे व अहिल्यानगर भागातील शेतकऱ्यांकडे बघण्याशिवाय पर्याय करायला नाही. पण अखेर देवानेच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांची गाऱ्हाने ऐकले आणि पाऊस पाठवून दिला.

सध्या दौंड परिसरातून होत असलेला दीड लाखांच्या जवळपास विसर्ग हा उजनीत मोठ्या प्रमाणावर पोहोचला असून यामुळे उजनीच्या पाणी पातळीत आठ टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत आहे. याच कमी झालेले पावसाचे कारण करीत वीज कपात करण्यात आली होती तीही चुकीच्या पद्धतीने. लोकांनी गाऱ्हाणं गायलेले नेत्यांनी आश्वासन दिली बैठका घेतल्या पण आपले पाऊस शेतापर्यंत पोहोचला. पण अजूनही वीज पोहोचू शकतील याच्या दुर्दैव आहे.

आता तरी जागे व्हा.. सध्या पावसामुळे व आलेल्या पाण्यामुळे दिलासा वाटत असला तरी नदीतून पाणी आपसूक शेतात येऊन पडणार नाही. त्यासाठी वीजेची गरज आहे. सध्या वाढलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या मोटारी पाण्यासोबत वाहून जाणार आहे. शिवाय बुडण्याचा धोका त्यामुळे नव्या अडचणी सोबत शेतकरी पर्याय शोधत आहे. त्याला वीज देऊन आपण सहकार्य करा. शेतकऱ्याला वीज देताना भेदभाव करू नका. अजून वीज यायचीय तो पर्यंत श्रेय तर मुळीच घेऊ नका.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE