अवघ्या सात दिवसांत उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ; 20 हजार क्यूसेकपेक्षा अधिक इनकमिंग कायम
करमाळा समाचार

पुणे जिल्हा व परिसरात गेल्या सात दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. अवघ्या आठवडाभरात धरणाची पाणीपातळी सुमारे मायनस 28 टक्क्यांवरून प्लस 43 टक्क्यांपर्यंत पोहोचली असून, धरणात आठवड्यात 70 टक्क्यांहून अधिक उपयुक्त पाणीसाठा जमा झाल्याचे चित्र आहे.

सध्या पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी दौड येथून अजूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे धरणात 20 हजार क्यूसेकपेक्षा अधिक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे.
उजनी धरणातील वाढता पाणीसाठा पाहता सोलापूर जिल्ह्यासह करमाळा, माढा आणि इंदापूर परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आगामी काळात पावसाचा जोर पुन्हा वाढल्यास धरणातील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.



