करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लाडकी बहीण योजनांमध्ये सुरक्षित… एसटीमध्ये असुरक्षित?

करमाळा समाचार

 

हजारो करोड रुपयांचा पूल बांधून अर्ध्या तासाचा वेळ वाचवला खरा पण आजही ग्रामीण मध्ये रस्ते नाही आणि हाल अपेष्ठा आजही सहन कराव्या लागतात ती गोष्ट वेगळी, पण कमीत कमी आपली “लाडकी बहीण लाडकी लेक” ही प्रवासाला, शाळेत जात असताना येताना सुखरूप घरी यावी यासाठी कमीत कमी एसटी तरी सुस्थितीत व सुरक्षित असावी ही अपेक्षा व्यक्त करणे महाराष्ट्राची बदनामी आहे का? असे असेल तर होय आम्ही बदनामी करतोय कारण आज पुन्हा तुमची एस टी मुलींना शाळेत सोडायला जाताना मध्येच बंद पडली.

करमाळा तालुक्यात मागील दोन ते तीन वर्षांपासून एसटी बंद पडण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. या संदर्भात आम्ही आवाज उठवत बऱ्याच वेळा वस्तुस्थिती समोर आणण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. यामध्ये शेकडो फोटो व व्हिडिओ समाज माध्यमातून वायरल करत संबंधित यंत्रणा व मंत्र्यांना जाग आणण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे यात तळागाळातून प्रत्येक व्यक्ती सहभाग झाला व त्यांनी हे आंदोलन हातात घेतले होते. कोणत्याही हिंसा न करता आपण आपले मुद्दे मांडले व त्याला यशही आले होते.

चर्चेतील पोस्ट

करमाळा तालुक्याला सर्वात आधी दहा एसटी गाड्या नव्या मिळाल्या हे आपले पहिले यश होते. पण त्यानंतर सर्व यंत्रणेवर आपण विश्वास ठेवून शांत होतो. बंद पडणाऱ्या गाड्यांचा काहीतरी पर्याय निघेल यातून आपली सुटका होईल अशी अपेक्षा होती. परंतु आजही तशीच परिस्थिती आहे. “लाडकी बहीण, लाडकी लेक” या महाराष्ट्रात आजही सुरक्षित व वेळेत घरात पोहोचू शकत नाही हे दुर्दैव आहे.
आज सकाळी कर्जत कडे निघाली एसटी बस रायगाव मध्येच बंद पडली. यातून फक्त आजची शाळा भरणार नाही सुट्टी मिळेल, पण अशीच एसटी निर्जनस्थळी रात्री अपरात्री बंद पडली तर सुरक्षिततेचे काय असा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नाहीतरी महावितरण, शाळा, शासकीय यंत्रणा ही खाजगीकरण करण्याच नियोजन असल्याचं बऱ्याच दिवसांपासून ऐकत आलेलो आहोत. तसेच एसटी एकदाची बंद करून खाजगी तत्वावर नियोजन करण्याचा आपला डाव असला तरी तो लवकरात लवकर आटपावा. कारण हळूहळू आपल्या नियोजनामुळे आमचे मात्र हाल होताना दिसत आहेत. तुम्ही खाजगीकरण करा किंवा सगळं विकून टाका तुम्हाला विचारणारा कोण आहे? आमची मागणी फक्त सुरक्षित प्रवास एवढीच आहे आणि यातून महाराष्ट्राची बदनामी करण्याचा कोणताही हेतू नाही.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE