करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

चिखलठाण युनियन बँकेत व्यवस्थापक नसल्याने शेतकरी व ग्राहकांचे हाल; तातडीने नियुक्तीची मागणी

करमाळा प्रतिनिधी :


करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथील युनियन बँक ऑफ इंडिया शाखेचे व्यवस्थापक यांची बदली होऊन बरेच दिवस उलटले असले तरी त्यांच्या जागी अद्याप नवीन शाखा व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे शाखेतील कामकाजावर परिणाम होत असून शेतकरी व सर्वसामान्य ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने पीककर्ज, कर्ज मंजुरी, खातेविषयक कामे, विविध बँकिंग सेवा आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रक्रिया रखडत असल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जात आहे. वारंवार शाखेत जाऊनही अनेक कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर चिखलठाण शाखेत तातडीने नियमित शाखा व्यवस्थापकाची नियुक्ती करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व ग्राहकांनी केली आहे. यासंदर्भात युनियन बँकेच्या कोल्हापूर प्रादेशिक कार्यालय तसेच मुख्य कार्यालयाकडे लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE