इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत जि. प. प्राथमिक शाळा हिवरवाडीचे घवघवीत यश
करमाळा

तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हिवरवाडीने यंदाच्या इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण सात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये उत्कर्ष धनाजी पवार, समीक्षा दत्तात्रय मेरगळ, श्रुती गोरख पवार, समर्थ महेश इरकर, जानवी राजेंद्र इरकर, प्रज्वल बापू इरकर आणि वैष्णवी निलेश इरकर यांचा समावेश आहे. या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि वर्गशिक्षक श्री. नाना वारे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
याशिवाय, विनोबा संस्थेतर्फे आयोजित ‘नन्हे सितारे स्पेलिंग बी’ स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी स्वराली राजेंद्र इरकर हिने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून आणखी एक मानाचा बहुमान मिळवला. तिला वर्गशिक्षिका सौ. दिपाली गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि वर्गशिक्षक श्री. नाना वारे यांचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विशेष म्हणजे, हेच विद्यार्थी गतवर्षी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेतही सहभागी झाले होते. त्यामुळे “खेळाबरोबर शिक्षण आणि शिक्षणाबरोबर खेळ” हा आदर्श या विद्यार्थ्यांनी कृतीतून सिद्ध केला आहे.
या सत्कार समारंभास मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


