तटकरे यांच्या विधानावरून महागाई, बाजारपेठ आणि सरकारी धोरणांवर प्रश्नचिन्ह
प्रतिनिधी

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी “महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले की त्या शॉपिंग करतात आणि व्यापारी आनंदी होतात” असे केलेल्या विधानानंतर राज्यभर चर्चा रंगली आहे.
सामान्य नागरिकांकडून या विधानावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, “आजच्या महागाईत १५०० रुपयांत नेमके काय शॉपिंग होणार?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वाढलेले किराणा दर, गॅस सिलिंडर, वीजबिल, शिक्षण आणि आरोग्याचा खर्च पाहता ही रक्कम अत्यल्प असल्याचे अनेकांचे मत आहे.
काही नागरिकांच्या मते, हे विधान आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांच्या वास्तवाशी विसंगत असून गरिबांच्या वेदनांची थट्टा करणारे वाटते, अशी भावना व्यक्त केली जात आहे.

याशिवाय, जर स्थानिक व्यापाऱ्यांनाही या १५०० रुपयांच्या हप्त्याची वाट पाहावी लागत असेल, तर बाजारपेठेतील मंदावलेली ग्राहक खरेदी किती गंभीर आहे, याचेही ते एक संकेत मानले जात आहेत, अशी चर्चाही सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर सरकारच्या आर्थिक धोरणांवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पंधराशे वेळेवर पोहचण्यासाठी व त्याची चर्चाचा जास्त होते. याऐवजी शेतकरी उत्पन्न वाढ, शेतीमालला भाव, ठेकेदार यांचे अडकलेले पैसे व नोकरदार थकलेल्या पगारी वेळेत झाल्या आणि महागाई आटोक्यात आणली तर खर्च आपोआप होईल त्यासाठी गर्दीही वाढेल जेणे करून सरकार देतेय त्या पंधराशे ची वाट पाहावी लागणार नाही.
दरम्यान, या विधानामुळे सामाजिक माध्यमांवर महागाई, सर्वसामान्यांचे आर्थिक वास्तव आणि कल्याणकारी योजनांच्या परिणामकारकतेवर व्यापक चर्चा सुरू झाली आहे.

