करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

मिरवणुकीचा खर्च वाचवून रस्त्यावरील खड्डे बुजवणार; गणेश व्यापारी मंडळाचा आदर्श निर्णय

करमाळा :

गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत तोच निधी सामाजिक कामासाठी वापरण्याचा आदर्श निर्णय श्री गणेश व्यापारी मंडळाने घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुकीचा खर्च कमी करून त्यातून जय महाराष्ट्र चौक ते फुलसोंदर चौक या मेन रोडवरील खड्डे बुजविण्याचा निर्णय मंडळाच्या सदस्यांनी एकमताने घेतला.

मेन रोडवरील या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, नागरिक, व्यापारी तसेच वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर केवळ उत्सवासाठी खर्च करण्यापेक्षा नागरिकांच्या दैनंदिन समस्येवर तो निधी खर्च करण्याचा निर्णय मंडळाने घेतला.

‘गणेशोत्सव हा केवळ उत्सव न राहता समाजोपयोगी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपणारा असावा,’ या भावनेतून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. मंडळाच्या या निर्णयाचे नागरिक आणि व्यापारी वर्गातून स्वागत होत असून, इतर गणेश मंडळांसाठीही हा उपक्रम एक सकारात्मक आदर्श ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

“गणरायाच्या उत्सवातून समाजहिताचे कार्य—हाच श्री गणेश व्यापारी मंडळाचा संकल्प!”

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE