करमाळ्याच्या प्रथमेश शिंदेची कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी!
पुणे येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक; मामासाहेब मोहोळ येथे घेतोय सराव

पुणे : पुणे येथे ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथमेश रमेश शिंदे याने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या यशामुळे क्रीडा क्षेत्रातून त्याचे अभिनंदन होत आहे. प्रथमेश हे बिल्डर रमेश पपू शिंदे यांचे चिरंजीव आहेत.
प्रथमेश सध्या मामासाहेब मोहोळ येथे कुस्तीचा सराव करत आहे. यापूर्वीही त्याने विद्यापीठस्तरीय स्पर्धेत पदक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले.

प्रथमेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, भविष्यातही त्याने कुस्ती क्षेत्रात मोठी भरारी घ्यावी, अशा शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.


