करमाळासोलापूर जिल्हा

मनसेच्या मागणीला यश महावितरणने केला वीज पुरवठ्याच्या वेळेत बदल ; कसा आहे बदल जाणुन घ्या

करमाळा समाचार

करमाळा तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याने तालुक्यात शेतकरी रात्रीच्या विजेमुळे काम करत असताना हल्ला होऊ शकतो. त्यामुळे दिवसाची वीज उपलब्ध करून द्यावी ही मागणी मनसेने केल्यानंतर लागलीच महावितरणच्या वतीने प्रतिसाद देत वीज मंडळाने वेळेत बदल केल्यामुळे मनसेच्या वतीने मनसेचे तालुका अध्यक्ष संजय बापू घोलप यांनी महावितरणचे आभार मानले आहेत.

आता करमाळ्यातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून प्रलंबित मागणी दिवसा वीज उपलब्ध करून द्यावी ही मागणी बिबट्याच्या प्रवेशानंतर का होईना मान्य होताना दिसत आहे. मनसेने आक्रमक भूमिका घेत बिबट्याचा वावर आहे तोपर्यंत शेतकऱ्यांना दिवसाची वीज उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली होती. त्याला मंडळाच्यावतीने योग्य प्रतिसाद मिळाला अन्यथा मनसेने आंदोलनाचा इशारा दिला होता.

बदललेली वेळ :-
Potegaon Substation 3 phase schedule… उद्यापासून

ads

Taratgaon and Padali Ag feeder
सकाळी 6 ते दुपारी 12.00= 6 तास

Borgaon Ag and Mirgavan Ag
दुपारी 12.00 ते संध्याकाळी 6.00

पुढील आदेश येईपर्यंत….

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE