सावधान ! शहरापासून दोन किमींच्या अंतरावर बिबट्या सदृश्य प्राण्याचा रेडकावर हल्ला
करमाळा समाचार
करमाळा तालुक्यात जंगली प्राण्यांकडून होणारे हल्ले आजतागायत सुरूच आहेत. कुत्रे, शेळ्या नंतर आता म्हशीच्या रेडकाला या प्राण्याने बक्ष केले आहे. करमाळा शहरापासून अवघ्या दोन किमीच्या अंतरावर हल्ला झाल्याने सदर जंगली प्राणी हा शहरातही शिरकाव करण्याचे दाट शक्यता असल्याने परिसरात व शहरात आता भीतीचे वातावरण पसरले लागले आहे. त्यामुळे अशा प्राण्यांवर वन विभागाने तात्काळ दखल घेणे गरजेचे बनले आहे.

रविवारी सकाळी सहा वाजण्याच्या पूर्वी निलज रोड येथे दिगंबर रासकर यांच्या म्हशीचे रेडकू हे बिबट्या सदृश्य जंगली प्राण्यांचे भक्ष केले आहे. हे अंतर करमाळा शहरापासून अवघ्या दोन किमीवर असल्याने आता हे जंगली प्राणी करमाळा शहरातही प्रवेश करतील काय असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. पहाटेच्या वेळी केलेला हल्ला अतिशय धाडसी स्वरूपाचा प्राणीच करू शकतो. त्यामुळे त्याच्यापासून आता नागरिकांना व ग्रामस्थांना ही भीती वाटणे सहाजिक आहे.

यापूर्वीही भिलारवाडी, जिंती, पारेवाडी परिसरात या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केल्याचे आपण पाहिलेले आहे. पण बऱ्याच दिवसापासून अशी कोणतीच घटना कानावर पडलेली नसल्याने त्याचा वावर आता आहे का नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. पण पुन्हा एकदा करमाळा शहराच्या पूर्व भागात झालेला हल्ला संशयाची पाल चुकचुकल्या शिवाय राहणार नाही.
काही दिवसांपूर्वी बोरगाव व परिसरात बिबट्या सदृश्य प्राणी दिसले याबाबत चर्चा झाल्या होत्या. शिवाय एका पाळीव प्राण्यावर ही हल्ला झाला होता. आज झालेला हल्ला एवढा जबर होता की मानगुटीचा घाव घेतल्याने म्हशीचे रेडकू जागेवरच निपचीत पडले होते.
वारंवार होणार्या हल्ल्यापासून वन विभागाने कोणतीही शिकवण घेतलेली दिसून येत नाही. तर या हिंस्र प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाचे कार्यालय हे मोहोळ येथे आहे. करमाळा येथे याचा एकही अधिकारी संबंधित प्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी नसल्याने नेमकी दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न अनेकदा पडतो. शिवाय अचानक अशा पद्धतीचा प्राणी दिसल्यास तात्काळ त्याच्यावर उपायोजना कोण करणार हाही मोठा प्रश्न आहे.